काय सांगता... कोणी तोडला चक्क भाजप नेते रावसाहेब दानवेंच्या बंगल्याचा दरवाजा?
जालन्यात भाजपा नेते तथा माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या घरी चोरीचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
ADVERTISEMENT

गौरव साळी, जालना: भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जालना शहरातील बंगल्यात अज्ञात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी घराचा मागील दरवाजा तोडून आत प्रवेश केला. मात्र, सुदैवाने घरातून कोणतीही मौल्यवान वस्तू चोरीला गेली नसल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
या घटनेमुळे जालना शहरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मागील दरवाजा तोडून घरात प्रवेश
ही घटना जालना शहरातील भोकरदन नाका परिसरातील रावसाहेब दानवे यांच्या बंगल्यात घडली. अज्ञात चोरट्यांनी बंगल्याच्या पाठीमागील बाजूचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. विशेष म्हणजे, घराच्या किचनचा दरवाजा तोडून चोरटे आत शिरल्याचेही तपासात समोर आले आहे.
हे ही वाचा>> बीड हादरलं! सासरवाडीत राहणाऱ्या जावयाचा कोणी केला निर्घृण खून? थेट काढला कोथळा..
कार्यालयीन कामकाजासाठी वापरला जातो बंगला
रावसाहेब दानवे सध्या या बंगल्यात वास्तव्यास नसल्याची माहिती समोर आली आहे. या बंगल्याचा वापर मुख्यत्वे कार्यालयीन कामकाजासाठी केला जातो. त्यामुळे घटना घडली तेव्हा घरात कोणीही उपस्थित नव्हते.









