Arnold Dix : ऑस्ट्रेलियाचा ‘तो’ टनल मॅन; ‘जो’ भारतात येऊन बनला हिरो!

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

Uttarkashi Tunnel Incident : गेल्या 17 दिवसांपासून भारतात एका मोठ्या बातमीने खळबळ उडाली होती. दिवाळीच्या ऐन दिवशी (12 नोव्हेंबर) उत्तरकाशीतील (UttarKashi) निर्माणाधीन बोगद्यात तब्बल 41 कामगार अडकले होते. दिवाळीच्या दिवसापासून लोकांच्या नजरा त्यांच्या बचावकार्याकडे लागल्या होत्या. यावेळी रॅट माइनिंग (Rat Mining) टीमला कामगारांना मंगळवारी (28 नोव्हेंबर) बोगद्यातून बाहेर काढण्यात यश आले. (Australia’s tunnel man Arnold Dix became a hero in India after Uttarkashi Tunnel Incident)

अनेक पथके गेल्या 17 दिवसांपासून बचाव कार्यात गुंतलेली होती. याआधी बोगद्यात ऑगर मशिनच्या साह्याने पाईप टाकले जात होते, मात्र टार्गेटच्या 12 मीटर आधी अडथळे आल्याने मशीन काम करू शकली नाही.

वाचा: 13 हजार न्यूड फोटो, फोन हाती घेताच गर्लफ्रेंड हादरली, मग ..

तब्बल 400 तास, 652 सरकारी कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नानंतर कामगार बाहेर आले. सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. यावेळचे अनेक फोटोही माध्यमांद्वारे व्हायरल होत आहेत. यामध्ये एक विदेशी व्यक्ती दिसत आहेत. ते कोण? असा अनेकांना प्रश्न पडला. तर असं आहे की, ते एक भूमिगत आणि वाहतूक पायाभूत सुविधा क्षेत्रातील तज्ञ आहेत. त्यांचं नाव अर्नोल्ड डिक्स आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अर्नोल्ड डिक्स आहेत तरी कोण?

अर्नोल्ड हे ऑस्ट्रेलियाचा नागरिक आहेत. ते स्वित्झर्लंडच्या इंटरनॅशनल टनेलिंग अँड अंडरग्राउंड स्पेस असोसिएशनचे (जिनेव्हा) प्रमुख आहेत. तीन दशकांपासून भूमिगत बांधकाम सुरक्षेसाठी ते काम करतात. उत्तरकाशीसारख्या घटनांप्रमाणे, त्यांना भूमिगत बांधकामाशी संबंधित कायदेशीर, तांत्रिक आणि पर्यावरणीय बाबी हाताळण्यासाठी बोलावलं जातं.

भूमिगत सुरक्षेव्यतिरिक्त, डॉक्टर डिक्स यांच्याकडे इतर ओळखपत्रे देखील आहेत. त्यांच्या arnolddix.com वेबसाइटनुसार, ते भूगर्भशास्त्रज्ञ, प्राध्यापक, अभियंता आणि वकील देखील आहेत.

ADVERTISEMENT

वाचा: Team India Head Coach Update: राहुल द्रविडबाबत मोठी बातमी, मुख्य प्रशिक्षक राहणार की नाही?

त्यांनी मेलबर्नच्या मोनाश विद्यापीठातून विज्ञान आणि कायद्यातील पदव्या मिळवल्या. जिनिव्हापूर्वी, 2016 ते 2019 या काळात त्यांनी कतारमध्ये ‘रेड क्रिसेंट सोसायटी’ या आंतरराष्ट्रीय एनजीओसोबत काम केले. तेथेही त्यांनी भूमिगत अपघातांना प्रतिसाद विकसित करण्यास मदत केली. यानंतर 2020 मध्ये अर्नोल्ड ‘लॉर्ड रॉबर्ट मेयर पीटर विकरी’सोबत जोडले गेले. त्यांनी भूमिगत सुरक्षेच्या गुंतागुंतींवर तांत्रिक आणि नियामक उपाय प्रदान करण्यासाठी भूमिगत कक्ष स्थापन करण्याचे काम केले.

ADVERTISEMENT

उत्तरकाशीत अर्नोल्ड डिक्स यांची भूमिका कशी ठरली महत्त्वाची?

प्रोफेसर डिक्स बोगद्याचे मूल्यांकन करण्यासाठी 20 नोव्हेंबर रोजी उत्तरकाशीला पोहोचले होते. सुरुवातीला डोंगर कोसळण्याची भीती होती. त्यामुळे त्यांनी परिसराची पाहणी केली. अनिश्चितता असूनही, ख्रिसमसच्या आधी कामगारांची सुटका केली जाईल असे अधिकाऱ्यांना आश्वासन देणारा डिक्स एकमेव होते.

रॅट मायनर्स ऑपरेशनमध्ये नेमकं काय घडलं?

रविवारी (26 नोव्हेंबर) बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना बाहेर काढण्यासाठी 5 रॅट होल मायनर्सना घटनास्थळी आणण्यात आलं. ट्रेंचलेस इंजिनीअरिंग सर्व्हिसेस या खासगी कंपनीने हे रॅट मायनर्स मागवले होते. त्यांनी दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये पाण्याच्या पाइपलाइन टाकताना त्यांची क्षमता दाखवून दिली आहे. उत्तरकाशीतील त्यांची काम करण्याची पद्धत ‘रॅट होल’ खाणकामापेक्षा वेगळी होती. या कामासाठी बोगद्यात तज्ज्ञ असलेल्या लोकांनाच पाचारण करण्यात आले होते.

वाचा: लोखंडी रॉडनं मित्राचं डोकं फोडलं, पोलिसांनी सांगितलं थरकाप उडवणारं हत्याकांड

ऑस्ट्रेलियाचे अर्नोल्ड ठरले भारताचे हिरो!

अरनॉल्ड आता हिरो बनले आहेत. या महिन्यात ऑस्ट्रेलियाकडून क्रिकेट विश्वचषक हरल्यानंतर सोशल मीडियावर काही भारतीयांनी ऑस्ट्रेलियन खेळाडूंना खूप शिव्या दिल्या होत्या. पण, आज एका ऑस्ट्रेलियन माणसाने भारतातील 41 मजुरांना वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सोशल मीडियावर लोक आता ऑस्ट्रेलियाचा जयजयकार करत आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT