Bank Holiday : मार्चमध्ये निम्मा महिना बँका राहणार बंद! संपूर्ण यादी

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

होळी (Holi), गुड फायड्रेसह (Good Friday) इतर दिवस बँकांना सुट्टी असल्या कारणाने मार्चमध्ये बँका 14 दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना बँकेच्या सुट्ट्याचे वेळापत्रक पाहुनच कामकाज करावे लागणार आहे.
bank holiday in march 2024 total 14 days bank will be close holi maha shivratri good friday festival
social share
google news

Bank Holiday In March 2024 : फेब्रुवारी महिना अखेर संपला आहे आणि आजपासून मार्च महिन्याला सुरूवात झाली आहे. मार्च महिन्यात जर तुम्हाला बँकेशी संबंधित कामे करायची आहेत, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. कारण मार्च (March) महिन्यात तब्बल 14 दिवस बँकांना सुट्टी (Bank Holiday) असणार आहे.  होळी (Holi), गुड फायड्रेसह (Good Friday) इतर दिवस बँकांना सुट्टी असल्या कारणाने मार्चमध्ये बँका 14 दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना बँकेच्या सुट्ट्याचे वेळापत्रक पाहुनच कामकाज करावे लागणार आहे. त्यामुळे नेमक्या कोणत्या दिवशी बँका बंद राहणार आहेत? हे जाणून घेऊयात.  (bank holiday in march 2024 total 14 days bank will be close holi maha shivratri good friday festival)  

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI)त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर बँकेच्या सुट्ट्याची लिस्ट टाकत असते. या लिस्टनुसार मार्चमध्ये संपूर्ण अर्धा महिना बँक बंद राहणार आहे. त्यामुळे तुम्ही जर मार्च महिन्यात बँकेंचे व्यवहार करणार असाल तर बँकेच्या या सुट्ट्याची यादी नक्की पाहा. सरकारकडून बँकांना दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टया असतात, त्यासोबत त्यांना रविवारच्या नेहमीप्रमाणे सुट्ट्या असतात. आणि मार्च महिन्यात होळी, महाशिवरात्री आणि गुड फ्रायडे असे सण असल्याने बँकांना इतक्या दिवस सुट्टया असणार आहेत. 

हे ही वाचा : शिंदेंचे आमदार लॉबीत भिडले! एकमेकांना धक्काबुक्की

मार्च महिन्यात बँकांना सुट्टया 

1 मार्च    : चापचूर कोट (मिझोरममध्ये सुट्टी)
3 मार्च    :  रविवार (सर्व ठिकाणी सुट्टी)
8 मार्च    : महाशिवरात्री (सर्व ठिकाणी सुट्टी)
9 मार्च    : दुसरा शनिवार (सर्व ठिकाणी सुट्टी)
10 मार्च  :  रविवार (सर्व ठिकाणी सुट्टी)
17  मार्च :  रविवार (सर्व ठिकाणी सुट्टी)
22 मार्च  :  बिहार दिवस (बिहारमध्ये सुट्टी)
23 मार्च  : चौथा शनिवार (सर्व ठिकाणी सुट्टी)
24  मार्च  :  रविवार (सर्व ठिकाणी सुट्टी)
25 मार्च  :  होळी (सर्व ठिकाणी सुट्टी)
26 मार्च  :  होळी (बिहार, मणीपुर आणि ओरिसात सुट्टी)
27 मार्च  :  होळी (बिहार)
29 मार्च : गुड फ्रायडे (सर्व ठिकाणी सुट्टी)
31 मार्च :  रविवार (सर्व ठिकाणी सुट्टी)

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अशा सगळ्या सुट्ट्या मिळून मार्चमध्ये तब्बल 14 बँका बंद असणार आहेत.  अनेक राज्यात विविध सण असतात, त्या सणांनुसार त्या त्या राज्यातील बँकांना सुट्टी दिली जाते. आता होळी हा सण संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. 25 मार्चला संपूर्ण देशभरात सुट्टी असते. या सुट्टीसह 26 आणि 27 मार्चला देखील बिहारमध्ये होळी साजरी होणार आहे. त्यामुळे या दोन दिवशी देखील बँकांची सुट्टी असणार आहे. 

हे ही वाचा : BJP First List : मोदी वाराणसी, तर शाह...; भाजपची 100 नावं निश्चित

दरम्यान जर तुम्हाला बँकेसंबंधित महत्वाचे काम उरकायचे असेल तर तुम्ही वरील बँकेंच्या सुट्ट्यांचे वेळापत्रक पाहून उरकून शकता. मात्र तरी देखील सुट्ट्यांमुळे तुमच्या कामकाजात अडचण येत असेल तर तुम्ही ऑनलाईन माध्यमातून आपल्या बँकेंच्या कामकाज आटपू शकता. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT