Maharashtra News : शिंदेंचे आमदार लॉबीत भिडले! एकमेकांना धक्काबुक्की
dada bhuse mahendra thorave fight in assembly : दादा भुसे आणि महेंद्र थोरवे यांच्यात का झाला वाद?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

दादा भुसे आणि महेंद्र थोरवे यांच्यात वाद

विधिमंडळ परिसरात एकमेकांना धक्काबुक्की

एकनाथ शिंदेंनी केली मध्यस्थी
Eknath shinde Shiv sena news : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आमदारांमध्ये राडा झाला. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना शिवसेनेच्या दोन आमदारांनी एकमेकांना धक्कीबुक्की केली. विधिमंडळ लॉबीमध्ये ही घटना घडली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करत दोन्ही आमदारांचा वाद मिटवला.
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या आमदारांमध्ये वाद उफाळून आला. कॅबिनेट मंत्री दादा भुसे आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यात वाद झाला. विधिमंडळ लॉबीमध्ये असताना दोन्ही आमदारांमध्ये जोरदार राडा झाला.
हेही वाचा >> Navneet Rana यांना महाराष्ट्र सरकारचा 'सुप्रीम' झटका
यावेळी दादा भुसे आणि महेंद्र थोरवे यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. याबद्दलचे फोटो अथवा व्हिडीओ समोर आले नाही. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन्ही आमदारांमध्ये मध्यस्थी करत असतानाचे व्हिडीओ समोर आले आहे.
महेंद्र थोरवे-दादा भुसेंमध्ये राडा
कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि दादा भुसे विधिमंडळ लॉबीमध्ये समोरासमोर आले. दोघांमध्ये राडा झाला. दोन्ही आमदारांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. हा प्रकार पाहून शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई आणि प्रतोद भरत गोगावले यांनी धाव घेतली आणि दोघांनी मध्यस्थी केली. त्यानंतर दोघांचा वाद मिटवला.