बीड : उसाच्या शेतात नेऊन महिलेवर बलात्कार, एवढ्यावरच थांबला नाही नराधम, पुढे...

मुंबई तक

उसाच्या शेताला पाणी देत असलेल्या महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची माहिती आहे. याविषयी पीडितेच्या पतीने आरोपीला जाब विचारला असता आरोपीने त्यालादेखील जातीवाचक शिवीगाळ केली आहे.

ADVERTISEMENT

Beed Crime
Beed Crime
google news

बातम्या हायलाइट

point

बीड : उसाच्या शेतात नेऊन महिलेवर बलात्कार,

point

एवढ्यावरच थांबला नाही आरोपी, पुढे...

Beed Crime, रोहिदास हातागळे : शेतात उसाला पाणी देत असलेल्या 30 वर्षीय महिलेवर उसाच्या पिकात नेऊन बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली आरोपीने दिली. तसेच पीडित महिलेच्या पतीने आरोपीकडे या प्रकरणी विचारणा केली असता त्याला जातीवाचक शिवीगाळ केली. ही घटना केज तालुक्यात एका गावात उघडकीस आली. या प्रकरणी एका आरोपी विरुद्ध बलात्कार व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. 

उसाच्या शेताली पाणी देत असतानाच...

केज तालुक्यातील एका गावातील 30 वर्षीय पीडित महिलेच्या कुटुंबाने बटईने शेती केली असून या शेतात उसाचे पीक आहे. या महिलेचे सासरे हे आजारी असल्याने त्यांच्यावर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. त्या आजारी सासऱ्याच्या जवळ या महिलेचे पती व सासू होती. 21 एप्रिल रोजी ही महिला एकटीच उसाच्या पिकाला पाणी देत होती. 

हे ही वाचा : नाशिक TCS प्रकरणातील आरोपी निदा खानला अटक, पुढे काय होणार?

लैंगिक अत्याचार आणि जातीवाचक शिवीगाळ

ती एकटी असल्याची संधी साधून आरोपी आसाराम रंगनाथ जाधव (रा. जाधवजवळा ता. केज) हा महिलेकडे गेला. महिलेस काय करीत आहेस? असे म्हणत त्याने महिलेच्या हाताला धरून ओढत उसाच्या पिकात नेले. याच वेळी महिलेने आरडा ओरडा केला, मात्र जवळपास कोणी नव्हते. त्या नंतर आसाराम जाधव याने तू मला आवडतेस, असे म्हणत बळजबरीने या महिलेवर अत्याचार केला. हा प्रकार कोणाला सांगितल्यास तुला जीवे मारून टाकीन, अशी धमकी दिली. त्या भीतीमुळे महिला ही गप्प राहिली. 

हे ही वाचा : 105 जवान अन् जंगलात 48 तास सर्च ऑपरेशन, अकोला अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक

आरोपीविरुद्ध बलात्कार व ॲट्रॉसिटीचा गुन्हा

या प्रकारामुळे मनोधैर्य वाढलेल्या आसाराम याने या महिलेच्या घरासमोरून वाहन घेऊन जात असताना हॉर्न वाजविला. त्यामुळे या महिलेने तिच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती आपल्या पतीला सांगितली. त्या नंतर पतीने जाऊन आरोपीला विचारणा केली असता तुला काय करायचे ते कर असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ केली. 7 मे रोजी रात्री पीडित महिलेने दिलेल्या तक्रारी वरून आसाराम रंगनाथ जाधव याच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात बलात्कार व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम हे पुढील तपास करीत आहेत.
 

हे वाचलं का?