मुंबईची खबर : महापौर रितू तावडे यांच्या प्रसिद्धी मोहिमेसाठी 25 लाखांचा प्रस्ताव, वाद का होतोय?

मुंबई तक

महापौर रितू तावडे यांच्या कार्यालयासाठी कोणत्याही स्वतंत्र संस्थेला किंवा नवीन प्रसिद्धी मोहिमेला मंजुरी देण्यात आली नव्हती, असे बीएमसीने स्पष्ट केले. सोशल मीडियावरील 25.12 लाख रुपयांचा प्रस्ताव आणि महापालिकेचा खर्च यांबाबत विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर हे स्पष्टीकरण देण्यात आले.

ADVERTISEMENT

Mumbai News
Mumbai News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

महापौर रितू तावडे यांची सोशल मीडिया पब्लिसिटी मोहिम

point

25 लाखांचा प्रस्ताव

point

शिवसेनेचा (शिंदे गट) आक्षेप

Mumbai News : मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या कार्यालयासाठी कोणतीही वेगळी संस्था नियुक्त करण्यात आलेली नाही किंवा अतिरिक्त प्रसिद्धी मोहीम राबवली जाणार नाही, असे स्पष्टीकरण बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) दिले आहे. महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीवर सुमारे 25 लाख रुपये खर्च केले जाणार असल्याचा दावा वृत्तात करण्यात आल्यानंतर पालिका प्रशासनाने हा खुलासा केला आहे. 

महापौरांच्या सोशल मीडिया हँडलसाठी 25 लाख?

महापौरांचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्यासाठी आणि त्याचा प्रचार करण्यासाठी एका वर्षाच्या कालावधीकरिता 25,12,786 रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव बीएमसीच्या स्थायी समितीसमोर मांडण्यात येणार होता. या प्रस्तावामुळे नागरी तिजोरीतून अतिरिक्त खर्च करण्याची काय गरज आहे, असा सवाल उपस्थित करत विरोधी पक्षाने यावर जोरदार आक्षेप घेतला होता. यानंतर महापालिकेच्या सोशल मीडिया हँडल्सचे व्यवस्थापन पाहणाऱ्या 'मेसर्स रनटाइम सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीलाच एका वर्षाची मुदतवाढ देण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले, तर सदर कंपनी गेल्या दोन वर्षांपासून हे काम पाहत असल्याचे महापौरांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले.

हे ही वाचा : पिंपरी-चिचवडमध्ये महिलेनं तोडला रेड सिग्नल, कारच्या धडकेत कोसळली; Video व्हायरल

रितू तावडेंनी फेटाळले आरोप

या वादावर बोलताना महापौर रितू तावडे यांनी या कंत्राटात आपली कोणतीही भूमिका नसल्याचे स्पष्ट करत निविदा प्रक्रियेतील हस्तक्षेपाचे आरोप फेटाळून लावले आहेत. "आपल्या कामाची माहिती प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचावी यासाठी आपण केवळ एक पत्र दिले होते. कंत्राट कोणाला द्यायचे हे ठरवण्यात आपला कोणताही सहभाग नाही. या प्रकरणात महापौरांचा कोणताही हस्तक्षेप नसून, या राजकारणात महापौरांचे नाव ओढणे थांबवावे," असे महापौर तावडे यांनी स्पष्ट केले. यासोबतच आपल्या कार्यालयाशी संबंधित सर्व प्रस्तावांची माहिती आपल्याला देण्यात यावी, असे पत्रही त्यांनी बीएमसीला दिले आहे.

हे ही वाचा : मुंबईत सुनेला संपवण्यासाठी सासूनं मोलकरणीला 3 लाखांची दिली सुपारी अन्...

किशोरी पेडणेकरांचा घणाघात

दुसरीकडे, विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी या खर्चावरून महापौरांवर आणि प्रशासनावर कडाडून टीका केली आहे. मागील तीन महिन्यांत झालेल्या 10 लाख रुपयांच्या खर्चाव्यतिरिक्त, महापौरांच्या सोशल मीडिया व्यवस्थापनावर आणखी 25 लाख रुपये का खर्च केले जात आहेत, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी नागरी प्रशासनाकडून या कथित खर्चाचे स्पष्टीकरण मागितले आहे. पालिका तिजोरीतून होणाऱ्या या खर्चावर विरोधी पक्षाने उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.