Century Rayon Blast : उल्हासनगरमध्ये सेंच्युरी कंपनीत स्फोट, कामगारांच्या उडाल्या चिंधड्या

मिथिलेश गुप्ता

ADVERTISEMENT

Two people died and five others were injured around Saturday noon following an explosion at a Century Rayon factory in ulhasnagar
Two people died and five others were injured around Saturday noon following an explosion at a Century Rayon factory in ulhasnagar
social share
google news

Century Rayon Blast News : उल्हासनगरमधील सेंच्युरी रेयॉन कंपनीत गंभीर दुर्घटना झाली आहे. यात तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे. कंपनीत काम सुरू असतानाच बॉयलर फुटल्याने ही घटना घडली. यात 5 कामगार जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. (theree people died in century rayon company blast)

उल्हासनगरमधील शहाडमध्ये सेंच्युरी रेयॉन कंपनी आहे. या कंपनीत धागे बनवले जातात. त्याचबरोबर केमिकल कंपनीही आहे. शनिवारी (23 सप्टेंबर) कंपनी काम सुरू होतं. सकाळी 11 वाजता अचानक स्फोट झाला. बॉयलर फुटल्याने हा स्फोट झाला.

सेंच्युरी रेयॉन कंपनी स्फोट : मृत्यू झालेल्यांची नावे काय?

हा स्फोट इतका भीषण होता की, 3 कामगार जागीच ठार झाले, तर काहीजण जखमी झाले. शैलेश यादव आणि लाला श्रीवास्तव अशी मृत्यू झालेल्या कामगारांची नावे आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> NCP: अजित पवार गटानं ‘या’ चार आमदारांची नाव का वगळली?

century rayon blast news today : 3 people died in blast

या स्फोटात इतर काही कामगार जखमी झाले. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले. स्फोटाची तीव्रता इतकी भयंकर कामगारांच्या शरीराच्या चिंधड्या उडल्या. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ADVERTISEMENT

भाजप आमदार कुमार आयलानी रुग्णालयात

भाजपचे उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी यांना घटनेची माहिती मिळताच रुग्णालयात धाव घेतली. सेंच्युरी रुग्णालयात जाऊन त्यांनी मृतांचे कुटुंबीय आणि दुर्घटनेत जखमी झालेल्या कामगारांची चौकशी केली. या घटनेची चौकशी करण्यात यावी आणि मृतांना तसेच जखमींना मदत करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> पुणे-चंद्रपूरची पोटनिवडणूक होणार नाही.. भाजपला नेमकी कसली भीती?

रोहित पवारांनी घेतली जखमींची भेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सेंच्युरी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. घटनेची माहिती घेतली. या स्फोट प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT