Chandrayaan-3 : विक्रम लॅंडरची पुन्हा सॉफ्ट लँडिंग! काय आहे ISRO चा हॉप प्रयोग?
चांद्रयान 3 मोहिमेअंतर्गत भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने आणखी एक मोठी कामगिरी केली आहे. विक्रम लॅंडर (Vikram Lander) आता चंद्रावरच पुन्हा लॅंड झाले आहे. प्रत्यक्षात ते लँड झालेलं नाहीये तर त्याने उडी मारलेली आहे.
ADVERTISEMENT
Vikram soft Landed Again : चांद्रयान 3 मोहिमेअंतर्गत भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने आणखी एक मोठी कामगिरी केली आहे. विक्रम लॅंडर (Vikram Lander) आता चंद्रावरच पुन्हा लॅंड झाले आहे. प्रत्यक्षात ते लँड झालेलं नाहीये तर त्याने उडी मारलेली आहे. चंद्रावर उतरलेल्या विक्रम लँडरने उडी मारण्याचा हा यशस्वी प्रयोग केला. अशाप्रकारे विक्रम लँडरने पुन्हा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केली. (Chandrayaan-3 Vikram Lander soft landed again What is hop experiment of ISRO)
ADVERTISEMENT
इस्रोच्या माहितीनुसार, ‘विक्रम लँडरने आपले ध्येय उद्दिष्ट पूर्ण केलेलं आहे. हा एक यशस्वी ‘हॉप प्रयोग’ आहे. सर्व यंत्रणा समान आणि निरोगी आहेत. प्रयोगानंतर, तैनात रॅम्प दुमडले गेले आणि यशस्वीरित्या पुन्हा व्यस्थित झाले. हे ‘किक-स्टार्ट’ भविष्यातील मानवयुक्त मोहिमांसाठी मार्ग मोकळा करेल.”
मुंबई ऑटो युनियनची महिलांसाठी ‘Touch Me Not’ विशेष मोहीम! का आहे वेगळी?
हॉप प्रयोग काय आहे?
यापूर्वी इस्रोने हॉपच्या प्रयोगाबाबत कधीही माहिती दिली नव्हती. त्यामुळेच विक्रम लँडरने आपल्या उद्दिष्टांपेक्षा अधिक साध्य केल्याचं म्हटलं जात आहे. लँडरला आदेश पाठवण्यात आला. आदेशानुसार, इंजिन सुरू झाले. लँडरने स्वतःला पृष्ठभागापासून सुमारे 40 सेंटीमीटर उंच केले आणि 30-40 सेमी अंतरावर पुन्हा सुरक्षितपणे उतरवले. याला हॉप प्रयोग म्हणतात.
हे वाचलं का?
Manoj Jarange : समाजासाठी विकली जमीन, हॉटेलात केलं काम; कोण आहेत मनोज जरांगे?
हॉप प्रयोगातून काय होणार?
जर लँडर कमांडवर फिरू शकत असेल, तर चंद्राच्या पृष्ठभागाचा अधिक पद्धतशीरपणे शोध घेता येईल. चंद्राच्या पृष्ठभागावर नेव्हिगेट करता येते. याशिवाय यानाला पुन्हा बोलवण्याचा मार्गही या छोट्या उडीने खुला होतो. अंतराळयानातून नमुने परत आणण्यासाठी किंवा मानवी लँडिंग मिशनसाठी हॉपचा प्रयोग खूप महत्त्वाचा ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT