Chandrayaan-3: प्रज्ञान रोव्हरचा चंद्रावर ‘मूनवॉक’, ISRO कडून नवीन व्हिडिओ जारी
भारताच्या चंद्रयान 3 ने 23 ऑगस्टला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिग केली होती. या लँडिंगनंतर चंद्रावर पाऊल ठेवणारा भारत, अमेरिका, रशिया ,चीननंतर चौथा देश ठरला होता. यासह दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा पहिला देश ठरलाय
ADVERTISEMENT
भारताच्या चंद्रयान 3 (chandrayaan 3) ने 23 ऑगस्टला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिग केली होती. या लँडिंगनंतर चंद्रावर पाऊल ठेवणारा भारत, अमेरिका, रशिया ,चीननंतर चौथा देश ठरला होता. यासह दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा पहिला देश ठरलाय. या लँडिंगनंतर विक्रम लँडरमधून पप्रज्ञान रोव्हर बाहेर पडला असून त्याने चंद्रावर संशोधन करायला सुरूवात केली आहे. यासंबंधित व्हिडिओ देखील इस्त्रो शेअर करत असते. असाच एक व्हिडिओ आता इस्त्रोने शेअर केला आहे. (chandrayaan 3 moon south pole rover moonwalk on moon isro new video share)
ADVERTISEMENT
चंद्रावर सॉफ्ट लँडिंग झाल्यानंतर 2 तास 26 मिनिटांनी प्रज्ञान रोव्हर लँडरमधून बाहेर पडला होता. त्यामुळे आता विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर या दोघांनी चंद्रावर संशोधन करायला सुरुवात केली आहे. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर लावण्यात आलेल्या पेलोड्स आणि कॅमेराद्वारे महत्वपुर्ण माहिती आणि फोटो मिळणार आहे.
हे ही वाचा : INDIA@ 100: ‘हे’ तंत्रज्ञान म्हणजेच भारतासाठी यशाची लांब उडी!
दरम्यान आता इस्त्रोने एक व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओत प्रज्ञान रोव्हर चंद्रावर चालताना दिसला आहे. आतापर्यंत साधारण आठ मीटर पर्यंत प्रज्ञान रोव्हरने चंद्रावर प्रवास केला आहे. तसेच रोव्हर लावण्यात आलेली उपकरणे देखील सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने आता रोव्हरने चंद्रावर संशोधन करायला सुरुवात केली आहे. तसेच रोव्हरचे मिशन लाइफ 1 चंद्र दिवस आहे. चंद्रावरील एक दिवस पृथ्वीवरील 14 दिवसांच्या बरोबरीचा असतो.
हे वाचलं का?
Chandrayaan-3 Mission update:
🔍What’s new here?
Pragyan rover roams in pursuit of lunar secrets at the South Pole! 🌗#Chandrayaan3 #ISRO pic.twitter.com/66988Mt4IJ
— LVM3-M4/CHANDRAYAAN-3 MISSION (@chandrayaan_3) August 26, 2023
प्रज्ञान रोव्हर काय काम करतोय?
प्रज्ञान रोव्हरवर दोन पेलोड लावण्यात आले आहेत. पहिले लेझर इंड्युस्ड ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोप (LIBS) आहे. हे चंद्राच्या पृष्ठभागावर असलेल्या रसायनांचे प्रमाण आणि गुणवत्तेचा अभ्यास करेल आणि खनिजांचाही शोध घेईल.
ADVERTISEMENT
याशिवाय,प्रज्ञान रोव्हरवरील दुसरा पेलोड अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर (APXS) आहे. हे घटकांच्या रचनेचा अभ्यास करेल. उदाहरणार्थ, मॅग्नेशियम, अॅल्युमिनियम, सिलिकॉन, पोटॅशियम, कॅल्शियम, कथील आणि लोह. या गोष्टीचा शोध लँडिंग जवळील चंद्राच्या पृष्ठभागावर शोधले जाणार आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : फोन चार्ज करायला गेली अन् गर्भवती महिलेचा…,धक्कादायक घटनेने शहर हादरलं
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT