Big News on Ladki Bahin Yojana : मोठी बातमी! लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे पैसे मिळणार की नाही?
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Update : राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) सुरुवात केली. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रतिमहिना 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
लाडकी बहीण योजना बंद होणार? CM शिंदे स्पष्टच बोलले...
CM शिंदे नेमकं काय म्हणाले?
डिसेंबर महिन्याचे पैसे खात्यात कधी जमा होणार?
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Update : राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) सुरुवात केली. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रतिमहिना 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. दरम्यान, राज्यातील VidhanSabha निवडणुकीची घोषणा होण्याआधी सरकारने ऑक्टोबर महिन्यातच नोव्हेंबरचे पैसे दिले आहेत. म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात पात्र महिलांना तीन हजार रुपये मिळाले आहेत. अशावेळी, आता डिसेंबर महिन्याचे पैसे मिळणार की नाही? असा प्रश्न महिलांना सतावत आहे. याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. (cm eknath shinde on mukhyamantri mazi ladki bahin yojana december installment will receive in november month vidhansabha election 2024)
ADVERTISEMENT
लाडकी बहीण योजना बंद होणार? CM शिंदे स्पष्टच बोलले...
Ek Nath Shinde on Ladli Bahin Yojana: विधासभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेबाबत विरोधकांकडून अनेक टीका-टिपण्ण्या होत आहेत. ही योजना काही महिन्यांसाठी आहे नंतर बंद होणार असंही बोललं जात आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना ही योजना खरंच बंद होणार का? डिसेंबर महिन्याचे पैसे मिळणार की नाही? असे अनेक प्रश्न पडले आहेत. पण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत स्पष्ट वक्तव्य केलं आहे.
हेही वाचा : Maharashtra Weather : पावसाची उघडीप! आता थंडीचा जोर वाढणार? वाचा IMD चा अंदाज
CM शिंदे नेमकं काय म्हणाले?
Ek Nath Shinde on Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "ही निवडणूक लाडक्या बहिणींच्या योगदान व शुभेच्छांवर जिंकणार आहे. लाडकी बहीण सुपरहिट झाली आहे. ज्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत, त्यांचा खात्यात डिसेंबरमध्ये जमा होतील. लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांच्या छातीत धडकी भरली आहे. सावत्र भाऊ लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी न्यायालयात गेले आहेत. लाडक्या बहिणींना पैसे दिले, यात आम्ही काय पाप केलं?," असा सवालही त्यांनी केला.
हे वाचलं का?
"लाडक्या बहिणींसाठी 100 वेळा मी जेलमध्ये जायला तयार आहे. या योजनेत जे खोडा घालत आहेत, त्यांना कोल्हापुरी जोडा दाखवा. लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. ती महिला सक्षमीकरणासाठी आहे, महिला सुखी तर देश सुखी, लाडक्या बहिणी अर्थव्यवस्थेचा कणा आहेत," असंही एकनाथ शिंदे म्हणाले. "हे सरकार देणारे आहे, घेणारे नाही. हे सरकार देना बँक आहे, लेना बँक नाही", असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला.
हेही वाचा : Mazi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री शिंदेंची प्रचंड मोठी घोषणा, लाडक्या बहिणांनी देणार 'एवढे' पैसे वाढवून!
डिसेंबर महिन्याचे पैसे खात्यात कधी जमा होणार?
Installment Payment in December:मुख्यमंत्री शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्यातील सहाव्या हफ्त्याबाबत मोठी अपडेट दिली आहे. ते म्हणाले, 'आचारसंहितेमुळे लाडक्या बहिणींना दिले जाणारे पैसे लांबणीवर पडू नयेत म्हणून आम्ही नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यातच दिले आहेत. राज्यात विधानसभेची निवडणूक 20 नोव्हेंबर रोजी आहे. त्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या निकालानंतर आम्ही महिलांना डिसेंबर महिन्याचे पैसे नोव्हेंबर महिन्यातच देणार आहोत.'
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT