Video : हृदयद्रावक! फलंदाजी करताना जागेवरच कोसळला, हार्ट अटॅकने तरूणाचा मृत्यू

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

cricket match death heart attack noida death player ran to take raun suddenly got heart attack delhi noida news
cricket match death heart attack noida death player ran to take raun suddenly got heart attack delhi noida news
social share
google news

Cricket Match Heart Attack Death : देशभरात हार्ट अटॅकच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढत चालल्या आहेत. या वाढत्या हार्टअटॅकच्या घटना सध्या तरूणांमध्ये सर्वाधिक आढळत आहेत.त्यामुळे तरूणांमध्ये भितीचे वातावरण आहे. आता अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत क्रिकेट खेळताना एका तरूणाचाा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. दिल्लीच्या नोएडात ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (cricket match death heart attack noida death player ran to take raun suddenly got heart attack delhi noida news)

नोएडाच्या थाना एक्सप्रेसवे सेक्टर 135 मध्ये ही घटना घडली आहे. या सेक्टरमधील एका मैदानात क्रिकेटचा सामना सूरू होता. या सामन्या दरम्यान एक तरूण मैदानात बँटींग करत असताना धाव घेत असताना खाली कोसळतो. तरूण खाली कोसळल्याचे पाहून इतर त्याचे सहकारी त्याला रूग्णालयात दाखल करतात. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे. हार्ट अटॅकमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. विकास नेगी असे या मृत तरूणाचे नाव आहे. तो उत्तराखंडचा रहिवासी आहे. विकासच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर आणि मित्रांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

हे ही वाचा : Mla Disqualification : राहुल नार्वेकर देणार शिंदे-ठाकरेंना धक्का देणारा निकाल?

व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहु शकता मैदानात सामना सुरू आहे. या सामन्या दरम्यान क्रिजवर असलेला तरूण विकेटच्या मागे चौकार मारतो. या चौकारानंतर नॉन स्ट्राईकवर असलेला विकास क्रिजवर असलेल्या तरूणाजवळ जातो. त्यानंतर पुन्हा माघारी येताना विकास अचानक जमीनीवर कोसळतो आणि बेशुद्ध होतो. विकास जमिनीवर कोसळलेला पाहून सर्व त्याच्या दिशेने धाव घेतात. मात्र विकास काहीच प्रतिक्रिया देत नसल्याने त्याचे मित्र त्याला रूग्णालयात दाखल करतात. मात्र डॉक्टर त्याला मृत घोषित करतात. मैदानात हार्ट अटॅक आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी त्यांना सांगितले आहे. या घटनेने विकासच्या कुटुंबावर दुखांचा डोंगर कोसळला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Mla Disqualification : शिंदे अपात्र ठरले तर मुख्यमंत्री कोण? भाजपचा प्लॅन-बी काय?

ही घटना शनिवारी घडली आहे. मृत मुलगा विकास हा मूळचा उत्तराखंडचा रहिवासी होता. सध्या ते दिल्लीतील रोहिणी येथे राहत होते. तो नोएडा येथील एका कंपनीत अभियंता म्हणून काम करत होता. या घटनेची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली आहे. या घटनेने विकासच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत, अशी माहिती नोएडा पोलिसांनी दिली आहे.

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT