Mumbai Weather: बिपरजॉयमुळे मुंबईचा समुद्र खवळला, ‘या’ भागात मुसळधार पावसाचा इशारा
Cyclone Biparjoy Alert: बिपरजॉयच्या मुंबईचा समुद्र काहीसा खवळला असून मुंबई नजीकच्या काही भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
मुंबई: चक्रीवादळ बिपरजॉय (Cyclone Biparjoy) हे आज (गुरुवार) गुजरातमध्ये (Gujarat) धडकलं. चक्रीवादळाची तीव्रता जसजशी वाढत आहे, तसतसा गुजरात आणि महाराष्ट्रात त्याचा प्रभाव वाढत आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये समुद्रातील हालचाली तीव्र झाल्या आहेत त्यामुळे समुद्रात (Sea) प्रचंड लाटा उसळत आहेत. बिपरजॉय वादळ हे आता गुजरातच्या विविध भागात धडकत आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाल्याचं समजतं आहे. त्याचवेळी चक्रीवादळाचा प्रभाव पाहता मुंबईत (Mumbai) देखील यलो अलर्ट (Yellow alert) जारी करण्यात आला आहे. (cyclone biparjoy sea mumbai thane warning heavy rain mumbai weather yellow alert)
ADVERTISEMENT
मुंबई-ठाण्यात यलो अलर्ट
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळाचा प्रभाव पाहता मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पावसासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच मुंबईत देखील या वेळी जोरदार वारे वाहू शकतात. मुंबईतील मरीन ड्राईव्हच्या फूटपाथपर्यंत समुद्राच्या लाटा उसळत आहेत. त्याचवेळी गेट वे ऑफ इंडिया येथेही समुद्रात उंच लाटा उसळत आहेत. मुंबईतील समुद्राची स्थिती पाहता जुहू बीचवर लोकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.
हे ही वाचा >> ‘एका जाहिरातीने…’, एकनाथ शिंदेंसमोर देवेंद्र फडणवीस ‘त्या’ जाहिरातीवर काय बोलले?
जोरदार पावसाचा अंदाज
आयएमडीचे महासंचालक डॉ मृत्युंजय महापात्रा म्हणाले की, बिपरजॉय हे एक अतिशय तीव्र चक्रीवादळ आहे ज्यात नुकसान होण्याची शक्यता आहे. ते म्हणाले की, वादळाच्या प्रभावामुळे कच्छमधील समुद्रात उंच लाटा उसळतील. त्याच वेळी, पोरबंदर आणि द्वारका जिल्ह्यांमध्ये जोरदार वाऱ्यासह जोरदार पाऊस पडेल.
हे वाचलं का?
#WATCH | Maharashtra: Visuals from Marine Lines in Mumbai as #CycloneBiparjoy is excepted to make landfall in Gujarat. High tide is expected in Mumbai at 10.29 am. pic.twitter.com/drYQP8HOQm
— ANI (@ANI) June 15, 2023
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, आज अरबी समुद्राच्या ईशान्येकडे जोरदार हालचाल सुरू आहे. समुद्रात 9 फुटांपासून 20 फुटांपर्यंतच्या वादळी लाटा उसळतील. समुद्रात येणाऱ्या भरती-ओहोटीमुळे किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसाचा इशाराही हवामान खात्याने जारी केला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> चित्रा वाघ सप्रिया सुळेंवर चांगल्याच भडकल्या! ‘मोठ्या ताई’ म्हणत दिलं प्रत्युत्तर
याचा परिणाम या राज्यांमध्येही दिसून येईल
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुजरात आणि महाराष्ट्रासह 9 राज्यांना सुपर चक्रीवादळाचा धोका आहे. लक्षद्वीप, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय आणि राजस्थान (पश्चिम) ही 9 राज्ये आहेत की जिथे चक्रीवादळामुळे मुसळधार पावसाची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT