2019 ला ‘कट्यार पाठीत घुसली’, मग आम्ही 2022 मध्ये…”, फडणवीसांनी ठाकरेंना केलं लक्ष्य
अखिल भारतीय नाट्य संमलेनानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार राजकीय फटकेबाजी करत विरोधकांवर निशाणा साधला. 2019 मध्ये कट्यार काळजात घुसली हा प्रयोग झाला तर 2022 मध्ये आम्ही आता होती गेली कुठं हा प्रयोग केला असल्याचे सांगत त्यांनी उद्धव ठाकरेंवर खोचक टीका केली.
ADVERTISEMENT
Marathi Natya Sammelan 2024 : पुण्यात 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या शुभारंभानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हजेरी लावत जोरदार फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी मराठी नाट्य रंगभूमीचा इतिहास सांगत समृद्ध मराठी रंगभूीमाचाही (Marathi Rangbhumi) झाला. या संमेअखिल भारतीय साहित्य संमेलन असो किंवा अखिल भारतीय नाट्यसंमेलन यांमध्ये राजकारण्यांची उपस्थिती हा नेहमीच वादाचा विषय ठरला आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नाटकावर बोलत त्यांनी उद्धव ठाकरे (Former Devendra Fadnavis) यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांच्या मानेला पट्टा दिसला की, आपल्याला सिंहासन सिनेमा (Marathi Cinema) आठवतो, मात्र आताच्या मुख्यमंत्र्यांना मानेच्या पट्ट्याची गरज नसल्याचे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली.
ADVERTISEMENT
केशरची शेती
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी नाट्याची आणि मराठी कलाकारांची दीर्घ परंपरा सांगत त्यांनी मराठी नाटकाला अण्णासाहेब पटवर्धनांनी केशराच्या शेतीची उपमा दिली. कारण मराठी नाट्य परंपरेला नाटककार, कलाकारांनी मोठे केले असल्याचे आपल्या देशात मराठी रंगभूमीसारखी समृद्ध परंपरा कुठेच दिसत नसल्याचे सांगत त्यांनी सर्व कलाकारांचेही कौतुक केल.
हे ही वाचा >> Sharad Mohol : घरात जेवले, अंगणात काढला काटा… रक्षक बनून घेतला बदला
महाराष्ट्राचा अमृतकाळाकडे
महाराष्ट्राचा 2035 साली अमृतकाळ होतो आहे. त्यामुळे त्या अमृतकाळाकडे जाताना आपले मराठी नाटक कोठे असणार, त्याची ध्येय धोरणं काय असतील, आपले कलाकार, लेखक आणि तंत्रज्ञान कुठे असेल त्याचा आतापासूनच नाट्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी विचार केला पाहिजे. तुमच्या क्षेत्रातील आम्हाला समजणार नाही पण त्यासाठी लागणारे सर्व प्रयत्न करून ते रंगभूमीचा विकास करायला राजकारणी नक्कीच मदत करतील असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला.
हे वाचलं का?
नाटक संपणार नाही
देवेंद्र फडणवीस यांनी मराठी नाटकाविषयी बोलतान सांगितली की, कितीही आर्टिफिशियल इंटेलिजेंस ( एआय ) आले तरी कला, संस्कृती आणि नाट्य कधीही संपणार नाही. कारण जोपर्यंत मराठी रसिक आहे, तो पर्यंत मराठी नाटक जिवंत राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी नाट्य आणि साहित्य संमेलनातील राजकारण्यांच्या सहभागाविषयी बोलताना त्यांनी खोचक टोला लगावत आम्हीही तुमच्यासारखेच नाटक करतो म्हणून राजकीय नेत्यांना आता नाट्य संमलेनाला बोलवलं पाहिजे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
ADVERTISEMENT
कट्यार पाठीत घुसली
नाट्य संमलेनात राजकीय कोट्या करत देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांचा समाचार घेतला. राज्यात 2019 मध्ये कट्यार पाठीत घुसली, काळजात नाही म्हणत हा प्रयोग महाराष्ट्रात झाला तर 2022 साली आता होती गेली कुठे हा प्रयोग आम्ही केला म्हणत त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> ‘बाप हा बाप असतो…’, आव्हाडांनी अजित पवारांना ठणकावून सांगितले
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT