Amruta Fadnavis : नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या अन् अमृता फडणवीस झाल्या ट्रोल, ‘त्या’ व्हिडिओत काय?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

devendra fadnavis wife amruta fadnavis wishes new year netizens in social media and troll happy new year 2024
devendra fadnavis wife amruta fadnavis wishes new year netizens in social media and troll happy new year 2024
social share
google news

Amruta Fadnavis Happy New Year Video : नवीन वर्षाचा आजचा पहिला दिवस आहे. यानिमित्त राजकिय नेते, कलाकार मंडळी, खेळाडू असे सर्वच मान्यवर देशवासियांना नववर्षाच्या शुभेच्छा देत आहेत. त्यात आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी देखील जनतेला नववर्षाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत. अमृता फडणवीस यांनी ‘जस्ट लुकिंग लाइक अ वॉव’ हा ट्रेंडिंग डायलॉग वापरून नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छांचा व्हिडिओ देखील त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओवरून आता अमृता फडणवीसांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे.  (devendra fadnavis wife amruta fadnavis wishes new year netizens in social media and troll happy new year 2024)

ADVERTISEMENT

व्हिडिओत काय?

अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून नेटकऱ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडिओत अमृता फडणवीस यांनी ‘जस्ट लुकिंग लाइक अ वॉव’ हा ट्रेडिंग डायलॉग वापरून नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘इटस सो ब्युटीफल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वॉव, हॅप्पी न्यू इयर, असे म्हणत सोशल मीडियावर अमृता यांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या दरम्यान त्यांची लेक दिविजाही त्यांच्यासोबत होती. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

हे ही वाचा : Sanjay Raut : ‘अजित पवारांचे सोम्या-गोम्या दिल्लीत’, राऊत भिडले, केला पलटवार

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Fadnavis (@amruta.fadnavis)

हे वाचलं का?

अमृता फडणवीस यांनी या व्हिडिओच्या कॅप्शनला, एक सुंदर, एक मोहक सुंदर आणि मोहक सुरुवात, नवीन वर्षाच्या शुभेच्छा मित्रानो, अशी सूंदर कॅप्शन लिहली आहे. या त्यांच्या व्हिडिओवर समीश्र प्रतिक्रिया येत आहेत. तर काही नेटकरी त्यांना सोशल मीडियावर ट्रोल देखील करत आहेत. दरम्यान अमृता फडणवीस यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओवर आतापर्यंत 44 हजाराहून अधित व्ह्युज मिळाले आहेत. तर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय.

हे ही वाचा : Lok Sabha 2024 : महाविकास आघाडीचं जागा वाटप ‘या’ निकषावर ठरणार!

दरम्यान पाचच दिवसांपूर्वीच अमृता फडणवीस यांनी आरती करत असल्याचा एक फोटो शेअर केला होता. या पुजा सोहळ्यात देवेद्र फडवणीसही सहभागी झाली होती. या फोटोवरून देखील अमृता फडणवीस यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT