Dharmrao Baba Atram : शिंदेंच्या कॅबिनेट मंत्र्याला नक्षलवाद्याची धमकी

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

cabinet minister dharmrao baba atram gets death treats from naxalites
cabinet minister dharmrao baba atram gets death treats from naxalites
social share
google news

Naxalite Threaten Dharmrao Baba Atram : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम (Dharmrao Baba Atram) यांना पुन्हा एकदा नक्षलवाद्यांकडून धमकी देण्यात आली आहे. लोखंडाच्या खाणीवरून धर्मरावबाबा आत्राम यांना ही धमकी देण्यात आली आहे. एटापल्ली तहसीलच्या गट्टा परिसरात पुन्हा एकदा नक्षलवाद्यांनी धर्मराव बाबा आत्राम, त्यांचे जावई आणि काही लोकांना पत्रके टाकून धमकावले आहे. वर्षभरात आत्राम यांना नक्षलवाद्यांकडून आलेली ही तिसरी धमकी आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. (dharmrao baba atram naxalites threaten third time cm eknath shinde minister)

मागील दोन वर्षापासून सूरजागड येथे लोह खाणीत खनिजांचे उत्खनन सुरु आहे. या उत्खननाला नक्षल्यांचा विरोध आहे. यासाठी धर्मराव बाबा आत्राम (Dharmrao Baba Atram) जबाबदार असून त्यांना किंमच चुकवावी लागेल,अशा प्रकारची धमकी पत्रकातून देण्यात आली आहे. हे पत्र वेस्ट सब झोनल ब्युरो श्रीनिवास यांच्या नावे असून त्यात आत्राम यांचे जावई ऋतुराज हलगेकर, त्यांचा भाऊ जयराज हलगेकर आणि कंपनीत काम करणारे भोलू सोमनानी, संजय चांगलानी यांची नावे आहेत.वर्षभरात आत्राम यांना नक्षलवाद्यांकडून आलेली ही तिसरी धमकी आहे.

हे ही वाचा :Women Reservation Bill : ‘घरच्या महिला आल्या की…’, भावना गवळीने केले काँग्रेसला लक्ष्य

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील सूरजागड येथे सुरू असलेल्या लोखंडाच्या खाणीतील खनिज उत्खननाबाबत नक्षलवाद्यांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना हिवाळी अधिवेशनादरम्यान आणि त्यानंतरही धमकी दिली होती. त्यांनतर आता धर्मराव बाबा आत्राम यांना तिसरी धमकी आली आहे. त्यामुळे धर्मरावबाबा आत्राम यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान धर्मराव बाबा आत्राम यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. मात्र अद्याप बाबा आत्राम यांना सुरक्षा पुरवण्यात आली नाही आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT