Diwali 2024 : उद्या दिवाळी! पूजेसाठी किती तासांचा शुभ मुहूर्त? जाणून पूजा विधी

मुंबई तक

Diwali 2024 Muhurat : दिवाळी म्हटलं की, रोषणाई, फटाक्यांचा आवाज, फराळ आणि नुसता जल्लोष डोळ्यासमोर येतो. यंदा 31 ऑक्टोबर 2024 रोजी म्हणजे उद्या दिवाळी साजरी केली जाईल.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

बातम्या हायलाइट

point

यंदा दिवाळीचा शुभ मुहूर्त कधी?

point

लक्ष्मीपूजनासाठी किती तासांचा मुहूर्त?

point

दिवाळी पूजा विधी

Diwali 2024 Muhurat : दिवाळी म्हटलं की, रोषणाई, फटाक्यांचा आवाज, फराळ आणि नुसता जल्लोष डोळ्यासमोर येतो. यंदा 31 ऑक्टोबर 2024 रोजी म्हणजे उद्या दिवाळी साजरी केली जाईल. दिवाळीत लक्ष्मी आणि गणपतीची पूजा केल्याने घरात ऐश्वर्य आणि समृद्धी येते असे म्हटले जाते. पौराणिक मान्यतेनुसार, या दिवशी भगवान श्री राम 14 वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत परतले आणि गावकऱ्यांनी दिवे लावले. तेव्हापासून दिवाळी साजरी करण्याची परंपरा सुरू झाल्याचे सांगितले जाते. हिंदू कॅलेंडरनुसार, दिवाळी हा सण कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावस्येला साजरा केला जातो.

यंदा दिवाळीचा शुभ मुहूर्त कधी?

यावेळी कार्तिक महिन्यातील अमावस्या तिथी 31 ऑक्टोबर रोजी म्हणजेच उद्या दुपारी 3:52 वाजता सुरू होईल आणि तिथी 1 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6:16 वाजता समाप्त होईल.

हेही वाचा : Congress Song : यंदा पंजा, यंदा पंजा... काँग्रेसचं प्रचारगीत, नाना पटोले मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? का होतेय चर्चा?

दिवाळी लक्ष्मी पूजनाची वेळ

प्रदोषकाळात दिवाळीची पूजा केली जाते, म्हणून या दिवशी प्रदोष काळ 31 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5.36 ते रात्री 8.11 पर्यंत असेल. त्याच वेळी, वृषभ राशीची वेळ संध्याकाळी 6:25 ते 8:15 पर्यंत असेल. त्याचबरोबर 31 ऑक्टोबर रोजी रात्री 11:39 ते 12:30 पर्यंत महानिशीथ काळात पूजेचा दुसरा मुहूर्त आहे. 

दिवाळी शुभ योग (Diwali 2024 Shubh Yog)

या वेळी दिवाळी खूप खास मानली जात आहे कारण या दिवशी 40 वर्षांपासून शुक्र आणि गुरूच्या संयोगामुळे समसप्तक योग तयार होत आहे. तसेच, शनी स्वतःच्या कुंभ राशीत बसून शश राजयोग निर्माण करत आहे.