डोंबिवली हत्याकांडाचा मास्टरमाइंड अडीच वर्षांनी जेरबंद ! वेश बदलून नांदेडच्या शेतात करत होता काम, पोलिसांनी अखेर आवळल्या मुसक्या

मुंबई तक

Dombivali crime : डोंबिवली हत्याकांडाचा मास्टरामाइंड अडीच वर्षांनी जेरबंद करण्यात आला. वेश बदलून नांदेडच्या शेतात काम करत होता, मात्र पोलिसांनी डोकं लावून वेशांतर करत फिल्मी स्टाइलने कारवाई करत मुसक्या आवळल्या.

ADVERTISEMENT

Dombivali crime
Dombivali crime
google news

बातम्या हायलाइट

point

डोंबिवली हत्याकांडाचा मास्टरामाइंड अडीच वर्षांनी जेरबंद

point

तरुणावर दगडाने हल्ला करत ठेचून ठार मारलं

Dombivali Crime : डोंबिवली हत्याकांडाचा मास्टरामाइंड अडीच वर्षांनी जेरबंद करण्यात आला. वेश बदलून नांदेडच्या शेतात काम करत होता, मात्र पोलिसांनी डोकं लावून वेशांतर करत फिल्मी स्टाइलने कारवाई करत मुसक्या आवळल्या. डोंबिवलीच्या विष्णुनगर पोलीस ठाणे परिसरात 27 नोव्हेंबर 2023 रोजी झालेल्या सोमनाथ बाबू शिंदे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी दीपक करकडे (वय 28) याचा पोलिसांनी नांदेड जिल्ह्यातील वाटेगाव येथे शोध घेतला. तब्बल अडीच वर्षानंतर पोलिसांनी तपास सुरु ठेवत, आरोपीला अटक केली. 

हे ही वाचा : 'आमच्यात कुठलेही विषय लपवण्याची आवश्यकता नाही..' उद्धव ठाकरेंच्या भेटीबद्दल फडणवीस काय म्हणाले?

नेमकी घटना काय? 

नोव्हेंबर 2023 मध्ये देवीचापाडा येथील स्मशानभूमीजवळ खाडीकिनारी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह छिन्नविछिन्न स्वरुपात आढळून आला. डोक्यावर आणि तोंडावर दगडाने हल्ला करत आरोपीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. संबंधित प्रकरणातील सीसीटीव्ही आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने मृताची ओळख सोमनाथ शिंदे असल्याची माहिती दिली.  

तरुणावर दगडाने हल्ला करत ठेचून ठार मारलं

संबंधित घटनेनंतर पोलिसांनी विलन ठावरे आणि योगेश डोंगरे यांना याआधी देखील अटक केली होती. त्यांच्या चौकशीनंतर केवळ किरकोळ वादातून दीपक करकडे यांच्या मदतीने सोमनाथ शिंदे यांच्यावर दगडाने हल्ला करत ठेचून ठार मारल्याचा कबुलीनामा दिला. मात्र, घटनेनंतर मुख्य आरोपी दीपक करकडे हा पोलिसांना हातावर तुरी देऊन फरार झाल्याचे सांगण्यात येत आहे.  

हे ही वाचा : 37 वर्षीय घटस्फोटित पुरुषाला लग्नासाठी व्हर्जिन तरुणी हवी, मध्यस्ती करणाऱ्या महिलेनं सांगितला घटनाक्रम, Video व्हायरल

दीपक करकडेने मोबाईल सिमकार्ड आणि वास्तव्याचे ठिकाण बदलले होते. विष्णुनगर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि मोबाईल लोकेशनच्या मदतीने माग काढला. आरोपी हा नांदेडमध्ये असल्याची खात्री पटल्यानंतर 24 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी पोलीस पथकाने वाटेगाव येथे वेशांतर करून सापळा रचत डोकं लढवून त्याला ताब्यात घेतले. संबंधित प्रकरणानंतर अडीच वर्षानंतर गुन्हेगाराला कायद्याच्या चौकटीत बसवले. यामुळे आता पोलिसांच्या कार्यक्षमतेचे आता कौतुक होऊ लागले आहे.

हे वाचलं का?