Pune: निसर्ग कवीची ‘एक्झिट’! ना. धों. महानोर यांचं निधन, शरद पवार झाले भावूक!

भागवत हिरेकर

रानकवी ना.धों. महानोर यांचे पुण्यातील रुबी क्लिनिक रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल शरद पवार यांनी शोक व्यक्त केला आहे.

ADVERTISEMENT

marathi poet and lyricist Namdeo Dhondo Mahanor died by long illness in pune.
marathi poet and lyricist Namdeo Dhondo Mahanor died by long illness in pune.
social share
google news

N.D. Mahanor News :

ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे
आणि या मातीतूनी चैतन्य गावे
कोणती पुण्ये अशी येती फळाला
जोंधळ्याला चांदणे लगडून जावे

या ओळी कानावर पडल्या की आपसुकच आठवतात ते ना. धों. महानोर! काळ्या आईची सेवा करताना महानोरांनी निसर्ग सौंदर्याला शब्दांचा साज दिला आणि त्यांच्या कवितेनं ग्रामीण साहित्यात वेगळी छाप सोडली. रानकवी, निसर्ग कवी अशा शब्दात गौरवल्या गेलेल्या महानोरांची प्राणज्योत 3 ऑगस्ट रोजी मालवली. ते ८१ वर्षांचे होते. (Famous Marathi Poet N.D. Mahanor Passed Away)

ना.धों. महानोर यांच्यावर पुण्यातील रुबी क्लिनिक रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी (3 ऑगस्ट) सकाळी साडेआठ वाजता निधन झाले. रुबी हॉल क्लिनिक मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात 20 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp