“अख्खे कुटुंब याच वावरात पुरेन”, भाजप आमदार सुरेश धसांच्या पत्नीसह तिघांविरुद्ध गुन्हा

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

fir Files against bjp mla suresh dhas wife prajakta dhas
fir Files against bjp mla suresh dhas wife prajakta dhas
social share
google news

Suresh Dhas Wife : भाजपचे आमदार (BJP MLA) सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांच्यासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओनंतर प्राजक्ता धस यांच्यासह तिघांविरुद्ध बीड जिल्ह्यातील आष्टी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. (FIR Lodged against Bjp Mla Suresh Dhas wife and three others)

15 ऑक्टोबर रोजी आष्टी तालुक्यातील वाळुंज येथे एक घटना घडली. त्यानंतर या घटनेचा व्हिडीओ समोर आला. पीडित महिलेने पोलिसांना दिल्या फिर्यादीत गंभीर आरोप केले आहेत.

सुरेश धसांच्या पत्नीवर आरोप… घटना काय?

40 वर्षीय पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, महिला १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता शेतात जनावरांसाठी चारा गाडीत भरत होती. तर पती आणि सून शेतात पाहणी करत होते. त्यावेळी रघू कैलास पवार व राहुल जगदाळे हे महिलेजवळ आले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Maratha Reservation : ‘ती’ जाहिरात शिंदे सरकारच्या अंगलट, 24 तासांत डॅमेज कंट्रोल?

महिला मका कापत असताना रघू पवारने महिलेला धरले आणि खाली पाडले. महिलेने विरोध केला. त्यावेळी राहुल जगदाळेने महिलेचे पाय धरले. त्यावेळी तिथे असलेल्या प्राजक्ता धस यांनी दोघांनाही महिलेला दाबा असे म्हटले. चांगला चोप द्या, मी आहे. घाबरू नका, असे प्राजक्ता धस म्हणाल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. यावेळी रघु पवार-राहुल जगदाळेंने माझी साडी ओढली, असं तक्रारीत म्हटलं आहे.

पती आणि सून आले अन् आरोपी पळाले

झटापट सुरू असताना तक्रारदार महिलेचा पती आणि सून घटनास्थळी आले. त्यांना पाहून रघु पवार, राहुल जगदाळे मक्याच्या शेतात पळून गेले. महिलेने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. या घटनेचे शुटिंग माझ्या सुनेने केले, असे तक्रारदार महिलेने म्हटले आहे.

ADVERTISEMENT

वाद का काय?

महिलेने तक्रारीत म्हटलं आहे की, पतीने प्राजक्ता धस यांना मारहाणीचं कारण विचारलं. तेव्हा प्राजक्ता धस म्हणाल्या की, हे शेत मी खरेदी केलेले असून, रघु पवारला बटाईने दिलेले आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Manoj Jarange-Patil: ‘आता वळवळ करायची नाही.. डावच उधळलाय’, जरांगे संतापले!

“तुझे अख्खे कुटुंब याच वावरात पुरेन”

या वादावादीनंतर महिलेला रघु पवारने धमकी दिली. “तुझे अख्खे कुटुंब याच वावरात पुरेन”, असे आरोपी म्हणाला. त्याचबरोबर “जमिनीवर तसेच तहसीलमध्ये माझे नाव आहे. तुम्ही मका कसे घेऊन जाता मी पाहते”, अशी धमकी प्राजक्ता धस यांनी दिल्याचे महिलेने म्हटले आहे.

प्राजक्ता धस सूत्रधार… तक्रारीत काय?

महिलेने तक्रारीत म्हटलं आहे की, तुम्ही पारध्याची असताना तुमची एवढी हिंमत कशी झाली, असे ते म्हणाले. पोलीस असल्यामुळे त्यांना आमच्यावर हल्ला करता आला नाही. त्यांनी नियोजित प्लान केला होता. सर्व सूत्रे प्राजक्ता धस यांच्यामार्फत हलत होती. राहुल जगदाळे आणि रघु पवारने माझे कपडे काढून विनयभंग केला आहे, असा आरोप महिलेने केलेला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT