Thane : नाचली गौतमी पाटील, पण शिंदेंच्या शिवसेनेवर टीकेची झोड, प्रकरण काय?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना महिला आघाडीने गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यावरून सुषमा अंधारे आणि जितेंद्र आव्हाड यांनी चिमटा काढला आहे.
ADVERTISEMENT

Gautami Patil Eknath shinde News : गौतमी पाटील हे नाव आता महाराष्ट्रासाठी अनोळखी नाही. खेड्यापाड्यापासून ते शहरांपर्यंत गौतमी पाटील फेमस झालीये. अपवाद वगळता गौतमी पाटीलचा प्रत्येक कार्यक्रम प्रसिद्धी झोतात येतो. चर्चेचा विषय ठरतो. आता दिवाळीनिमित्त गौतमी पाटीलचा प्रथमच ठाण्यात लावणीचा कार्यक्रम झाला. पण, हा कार्यक्रम हुल्लडबाजी आणि गोंधळामुळे चर्चेत आला नाही, तर त्याचं कारण वेगळंच आहे. पण, या सगळ्यात विरोधकांच्या रडावर आलीये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना. गौतमी पाटील ठाण्यात नाचून गेली, पण टीकेची धनी झाली शिंदेंची शिवसेना.
शिवसेना महिला आघाडीच्या वतीने म्हणजे ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या वतीने ठाण्यात दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चिंतामणी चौकात झालेल्या या दिवाळी पहाट निमित्त गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. १२ नोव्हेंबर रोजी हा कार्यक्रम झाला.
गौतमीच्या नृत्य… शिंदेंची उपस्थिती..
ठाण्यात झालेल्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. एकनाथ शिंदेंनी गौतमी पाटीलचं स्वागत केलं. दिवाळी पहाट कार्यक्रमात गौतमी पाटीलने लावणी सादर करत उपस्थितांचं मनोरंजनही केलं. पण, त्यानंतर विरोधकांनी एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं.
गौतमी पाटीलने नुकतीच ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमातील गौतमीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.#GautamiPatil #Thane #EknathShinde pic.twitter.com/Q9QKeYLKk9
— Mumbai Tak (@mumbaitak) November 13, 2023