नागपुरातील प्राध्यापकांचा संतापजनक कारनामा! विद्यार्थिनींनीकडे करत होता शरीर सुखाची मागणी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नागपूरमधील सिंधी महाविद्यालयातील एक धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. एका प्राध्यापकाकडून अनेक विद्यार्थीनींकडे शरीर सुखाची मागणी करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पाचपावली पोलीस ठाण्यात विद्यार्थींनींच्या तक्रारींवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी प्राध्यापक सध्या फरार आहे.

ADVERTISEMENT

नागपूरमधील पाचपावली परिसरात सिंधू महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाच्या कम्प्युटर सायन्स विभागप्रमुख पदी म्हणून प्रा. राकेश गेडाम आहेत. प्रा. राकेश गेडाम यांच्याकडूनच विद्यार्थीनींकडे शरीर सुखाची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. युवा सेनेच्या कार्यकर्त्यांमुळे या प्रकरणाला वाचा फुटली आहे.

या प्रकरणात विद्यार्थींनीकडून पाचपावली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. विद्यार्थींनीच्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी प्रा. राकेश गेडाम याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पाचपावली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर नागपुरातील सिंधू महाविद्यालय प्रशासनाने प्रा. राकेश गेडाम याला निलंबित केलं.

हे वाचलं का?

Crime: डॉक्टर प्रियंकाची आत्महत्या नाही, तर डॉक्टर पतीनेच ‘यांच्या’ साथीने केली हत्या

पोलिसांनी नोंदवले जबाब

ADVERTISEMENT

नागपुरातील सिंधी महाविद्यालयातील अनेक मुलींनी प्राचार्य राकेश गेडाम याच्याविरुद्ध विरोधात शरीर सुखाची मागणी केल्याचं पाचपावली पोलीस ठाण्यातत दिलेल्या तक्रारीत नमूद केलेलं आहे. हे संपूर्ण प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचं लक्षात येताच पोलिसांनी तत्काळ दखल घेत सर्व मुलींचे जवाब नोंदवले आहेत.

ADVERTISEMENT

प्रा. गेडाम हा कुणाला पास करण्याचे आमिष दाखवून, तर कुणाला नापास करण्याची भीती दाखवून विद्यार्थीनीसोबत लज्जास्पद वर्तन करायचा, असं विद्यार्थीनींच्या तक्रारीतून समोर आलं.

तुझ्या पॉर्न व्हिडीओतून पैसे कमावेन ! नातेवाईकांकडून पत्नीवर सामूहिक बलात्कार, गुन्हा दाखल

या संपूर्ण प्रकरणाला नागपुरातील युवासेनेचे प्रमुख विक्रम राठोड आणि त्यांच्या सहकाऱ्याने वाचा फोडल्यानंतर एका मागून एक विद्यार्थीनी पोलीस स्थानकामध्ये तक्रार देण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. दरम्यान, गुन्हा दाखल होताच प्रा. गेडाम फरार झाला असून, नागपुरातील पाचपावली पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT