30th November Gold Rate: सोनं घ्या सोनं! 24 तासातच सोन्याच्या भावात मोठी घसरण, मुंबईत आजचे भाव काय?
Today Gold Rate : सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आज 30 नोव्हेंबरला संपूर्ण देशात सोन्याच्या भावात घसरण झालीय. आज 24 कॅरेट सोन्याच्या भावात 1100 रुपयांची घट झाली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

आजचे सोन्याचे भाव वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल

सोन्याच्या भावात किती रुपयांनी झाली घसरण?

आजचे सोन्याचे-चांदीचे भाव काय?
Today Gold Rate : सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आज 30 नोव्हेंबरला संपूर्ण देशात सोन्याच्या भावात घसरण झालीय. आज 24 कॅरेट सोन्याच्या भावात 1100 रुपयांची घट झाली आहे. तर 22 कॅरेट सोनंही स्वस्त झालं आहे. आज सोने-चांदीच्या भावात किती रुपयांची घसरण झाली आहे, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती. आज 30 नोव्हेंबरला 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 100 ग्रॅममध्ये 900 रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे आजची सोन्याची किंमत 5,86,200 रुपयांवर पोहोचली आहे. तर 18 कॅरेटच्या प्रति 10 ग्रॅमच्या सोन्याच्या दरात 90 रुपयांनी घट झालीय, त्यामुळे याची किंमत 58620 रुपये झाली आहे.
आज 22 कॅरेट सोनं इतक्या रुपयांनी झालं स्वस्त
आज 22 कॅरेटच्या प्रति 10 ग्रॅम सोन्याच्या भावात 110 रुपयांनी घसरण झाली आहे. अशातच आज सोन्याची किंमत 71650 रुपये झाली आहे. तसच काल 29 नोव्हेंबरला सोन्याची किंमत 71760 रुपये होती. 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 100 ग्रॅमच्या दरात 1100 रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे सोन्याची किंमत 7,16,500 रुपये झाली आहे. आज 30 नोव्हेंबरला 24 कॅरेटचं प्रति 10 ग्रॅम सोनं 110 रुपयांनी स्वस्त झालं आहे. याची किंमत आज 78150 रुपयांवर पोहोचली आहे. तर 24 कॅरेट सोनं प्रति 10 ग्रॅम 1100 रुपयांनी स्वस्त झालं असून आज सोन्याची किंमत 7,81,500 रुपयांवर पोहोचली आहे.
हे ही वाचा >> Cyclone Fengal : फेंगल चक्रीवादळाचा महाराष्ट्राला धोका? 100 किमी वेगानं धडकणार, 7 राज्यांना सतर्कतेचा इशारा
आज चांदीचे भाव काय?
आज 30 नोव्हेंबरला चांदीच्या भावात कोणतेही बदल झाले नाहीत. काल शुक्रवारी चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचं समोर आलं होतं. 27 आणि 28 नोव्हेंबरला संपूर्ण देशात चांदीच्या दरात कोणताही बदल झाला नव्हता. आज चांदीचे 10 ग्रॅमचे भाव 915 रुपयांवर आले आहेत. तर 100 ग्रॅम चांदीचा भाव 9150 रुपयांवर पोहोचला आहे. याशिवाय आज 1 किलो चांदीचा भाव 91500 रुपये झाला आहे.
हे ही वाचा >> Sanjay Shirsat Vs Sanjay Raut : "जे चेहऱ्यावर असतं तेच मनात असतं", शिंदेंच्या नाराजीबद्दल काय म्हणाले शिरसाट?
मुंबईत सोन्याचे भाव