Sanjay Shirsat Vs Sanjay Raut : "जे चेहऱ्यावर असतं तेच मनात असतं", शिंदेंच्या नाराजीबद्दल काय म्हणाले शिरसाट?

सुधीर काकडे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

एकनाथ शिंदे अचानक गावी रवाना

point

दिल्लीतील बैठकीनंतर शिंदे नाराज?

point

संजय शिरसाट काय म्हणाले?

Sanjay Shirsat Vs Sanjay Raut : एकनाथ शिंदे हे राजकीय घडामोडी सोडून अचानक गावी नघून गेल्यानं वेगवेगळ्या चर्चा सुरू झाली आहे. यावरुन आता संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. एकनाथ शिंदे नाराज आहेत असं समजण्याचं काही कारण नाही. काही लोकांना त्यांचा चेहरा पडलेला दिसतो, पण पोटावर एक आणि ओठावर एक असं असणारी आमची औलाद नाही, नाराजी असेल तर आम्ही उघडपणे जाहीर करु. जे आमच्यावर टीका करत आहेत, त्यांनी अडीच वर्ष लाचारी केली असं संजय शिरसाट म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली, तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या, माझी त्याला सहमती असेल, महायुतीमध्ये मध्ये कुठलाही ताणतणाव नाही. 
 

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Sankarshan Karhade Poem : "विरोधकच नसल्यानं, मुख्यमंत्रिपदाचं कोडंही लवकर सुटेल", संकर्षण कऱ्हाडेची कविता पुन्हा व्हायरल

भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद का दिलं हे संजय राऊत यांनाही माहिती आहे. आम्ही जे मिळवलं ते कष्टाने मिळवलं. आम्ही केलेला उठाव देशानं पाहिलं. ज्या आमदारांना पन्नास खोके, एकदम ओके असा नारा काढला, ते कैलास गोरंट्यालही पडलेत असं संजय शिरसाट म्हणाले. तसंच जनतेने या गद्दारांनाच नाकारलं असून, आम्हाला 57 आमदार निवडून दिलेत असं शिरसाट म्हणाले. 

संजय राऊत यांनी कोणकोणत्या माध्यमातून फोन केले याचे रेकॉर्ड आमच्याकडे आहेत, परंतू आम्ही नाही म्हटल्यामुळे यांची पोपटपंची सुरू झाली. आता ते भाजपकडेही जाऊ शकत नाही, काँग्रेससोबतही त्यांचं जमत नाही असं शिरसाट म्हणाले. 

हे वाचलं का?

दिल्लीत भाजप हायकमांडच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. दिल्लीत एकनाथ शिेदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची अमित शाह आणि जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीतील फोटोमध्ये एकनाथ शिंदे नाराज असल्याचं दिसतंय अशी चर्चा आहे. त्यानंतर मुंबईत आल्यानंतर शिंदे थेट आपल्या मुळ गावी अर्थातच सातारा जिल्ह्यातील दरे गावी गेल्यानं मोठ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. 


ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT