Sankarshan Karhade Poem : "विरोधकच नसल्यानं, मुख्यमंत्रिपदाचं कोडंही लवकर सुटेल", संकर्षण कऱ्हाडेची कविता पुन्हा व्हायरल
राजकारणाकडे पाहणाऱ्या सर्वसामान्यांना अभिनेता संकर्षण कऱ्हाडेची एक कविता सध्या चांगलीच भावताना दिसते आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मुख्यमंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार?

मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटेना...

अभिनेता संकर्षण कऱ्हाडेची कविता व्हायरल
राज्यातील निवडणुका पार पडून आठवडाही उलटून गेला असताना मुख्यमंत्रिपदाचा तिढा अजून सुटत नाहीये. दिल्लीत, मुंबईत बैठकांचा सिलसिला सुरूच आहे. मात्र अजूनही कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं दिसेना. अशातच राजकारणाकडे पाहणाऱ्या सर्वसामान्यांना अभिनेता संकर्षण कऱ्हाडेची एक कविता सध्या चांगलीच भावताना दिसते आहे. संकर्षण कऱ्हाडे एका माध्यम कार्यालयात गेला असताना तिथे त्यानं सादर केलेली एक कविता सध्या चांगलीच व्हायरल होते आहे.
संकर्षणची कविता नेमकी काय?
हे ही वाचा >>Murlidhar Mohol : "माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा...", पहिल्याच टर्ममध्ये केंद्रात मंत्रिपद मिळालेले मोहोळ काय म्हणाले?
सगळी गावं तुझीच आहेत,
तू अर्ज भरून पाहावं...
मला वाटतं पांडुरंगा तू
एकदा निवडणुकीला उभं राहावं...
मग ना पावसातल्या सभा,
ना प्रचाराचा घाम,
तुझे स्टारप्रचारक देवा
ग्यानबा तुकाराम...
प्रचाराच्या जाहिरातीत
ओव्या कानी पडतील,
बॅनर बघून विट येण्यापेक्षा
हात जोडले जातील...