Gold Price: बापरे! बाप्पाच्या आगमनाआधीच सोन्याचे भाव गगनाला भिडले!
Gold-Silver Price Today : गणपती बाप्पाच्या आगमनाला आता फक्त काही तास उरले आहेत. देशभरात सणसमारंभ तोंडावर आलेले असताना आज (6 सप्टेंबर 2024) सोन्याने पुन्हा एकदा उच्चांक गाठला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
गणपती बाप्पाच्या आगमनाला आता फक्त काही तास
सराफा बाजारात सोन्याच्या दरात उसळी
तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?
Gold-Silver Price Today : गणपती बाप्पाच्या आगमनाला आता फक्त काही तास उरले आहेत. देशभरात सणसमारंभ तोंडावर आलेले असताना आता मात्र, सराफा बाजारात सोन्याच्या दरात उसळी घेतली आहे. सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ होताना पाहायला मिळत असते. अशावेळी आज (6 सप्टेंबर 2024) सोन्याने पुन्हा एकदा उच्चांक गाठला आहे. अशावेळी आजचे भाव कितीने वाढले सविस्तर जाणून घेऊया. (gold-silver prices hike today 06 september 2024 in maharashtra mumbai pune know the details)
सोन्या-चांदीच्या दरांमध्ये रोज बदल होत असतात. कधी सोन्या-चांदीच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळते. आज शुक्रवारी सोन्याच्या दरात पुन्हा एकदा मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
हेही वाचा : lalbaugcha Raja : अनंत अंबानींवर 'लालबागचा राजा' मंडळाची मोठी जबाबदारी, 'या' पदावर नियुक्ती का केली?
Goodreturns वेबसाईटनुसार, गुरूवारी (05 सप्टेंबर 2024) 24 कॅरेट 10 ग्रॅम (1 तोळा) सोन्याचा भाव 72, 760 रूपये होता. पण आज यामध्ये 550 रूपयांनी वाढ झाली असून तो 73, 310 रूपयांवर पोहोचला आहे. तर, 22 कॅरेट सोन्याच्या भावातही 510 रुपयांनी वाढ झाली आहे. त्याचवेळी, एक किलो चांदीची किंमत 85,000 रूपयांवरून 87000 रूपयांवर पोहोचली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे भारतात सोने दागिन्यांच्या किंमती बदलत असतात.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?
मुंबई
-
10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 67,160 रूपये आहे.
ADVERTISEMENT
पुणे
ADVERTISEMENT
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 67,160 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,260 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54,950 रूपये आहे.
नागपूर
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 67,160 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,260 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54,950 रूपये आहे.
नाशिक
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 67,190 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,290 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54,980 रूपये आहे.
22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?
सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो.
हेही वाचा : Ganesh Chaturthi 2024: बाप्पाचं आगमन अवघ्या काही तासांवर; जाणून घ्या पूजा, विधी अन् 'या' महत्त्वाच्या गोष्टी...
22 कॅरेट सोने, चांदी, निकेल, जस्त आणि तांबे यासह इतर मिश्रधातूंचे दोन भाग एकत्रित करणारे सोन्याचे मिश्रण आहे. 22 कॅरेट सोने हे 24 कॅरेट सोन्यानंतरचे सर्वोत्तम दर्जाचे आहे. तर, 24 कॅरेट सोने हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांना किंवा ज्वेलर्ससाठी उपलब्ध असलेले सर्वात शुद्ध सोने आहे. 24-कॅरेट सोन्यामध्ये तांबे, निकेल, जस्त किंवा चांदी यांसारख्या मिश्र धातुंसह 99.99% सोने असते.
ADVERTISEMENT