lalbaugcha Raja : अनंत अंबानींवर 'लालबागचा राजा' मंडळाची मोठी जबाबदारी, 'या' पदावर नियुक्ती का केली?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Anant Ambani At Lalbaugcha Raja
Anant Ambani At Lalbaugcha Raja
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अनंत अंबानी यांच्या खांद्यावर लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाची मोठी जबाबदारी

point

अनंत अंबानी यांना लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाची जबाबदारी का दिली?

point

अनंत अंबानी यांना लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या कोणत्या पदावर नियुक्त केलंय?

Anant Ambani In lalbaugcha raja Ganesh Utsav Mandal :  संपूर्ण जगभरात लोकप्रिय असलेल्या लालबागच्या राजा गणेशोत्सव मंडळाची जय्यत तयारी सुरु झाली आहे. कारण उद्या ७ सप्टेंबरला सर्वांचा लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. विशेष म्हणजे दरवर्षी मुंबईसह देशभरातून लाखो भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनाला येतात. त्यामुळे या मंडळाची जबाबदारी दिग्गजांकडे सोपवली जाते. अशातच रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांच्याही खांद्यावर मंडळाची मोठी जबाबदारी देण्यात आलीय. 

अवघ्या काही तासांनंतर गणेशोत्सवाला प्रारंभ होणार आहे.  याच पार्श्वभूमीवर अनंत अंबानी यांना लागबागचा राजा मंडळाकडून अत्यंत महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. या सभेत अनंत अंबानी यांना प्रमुख जबाबदारी देण्याच्या प्रस्तावाला एकमताने मंजुरी देणयात आली. यानुसार, अनंत अंबानी यांना मानद सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

हे ही वाचा >> Today Horoscope : या' राशीच्या लोकांना मिळणार गुड न्यूज! जाणून घ्या आजचं राशी भविष्य

अंबानी कुटुंबीयांनी धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचं योगदानं दिलं आहे. दरवर्षी अंबानी कुटुंब भक्तीभावाने लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येतात. या कुटुंबीयांचा गणपती बाप्पासाठी असलेला सेवाभाव पाहून त्यांचाही समावेश मंडळाच्या कार्यकारिणीत करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.मुंबईच्या पिटलाबाई चाळीत लालबागच्या राजाची प्रतिमा स्थापित करण्यात येते. हा गणेश मंडळ मुंबईतील सर्वात मोठा मंडळ आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या गणेशोत्सव मंडळात लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लाखो भाविक उपस्थित राहतात. देशात ७ सप्टेंबरला गणशोत्सवाला सुरुवात होत आहे. दहा दिवस गणेशोत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लालबागचा राजा मंडळाची तयारी पूर्ण झाली आहे. शुक्रवारपासून गणेशभक्त लालबागच्या राजाच्या दर्शनसाठी येणार आहेत. प्रत्येक वर्षी लालबागच्या राजाच्या प्रतिमेचं डिजाईन बदललं जातं, ही लालबागच्या राजाची खासियत आहे. 

हे ही वाचा >> Maharashtra Weather: जरा जपून... धो-धो पाऊस बरसणार! IMD चा 'या' जिल्ह्यांना अलर्ट 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT