Today Horoscope : या' राशीच्या लोकांना मिळणार गुड न्यूज! जाणून घ्या आजचं राशी भविष्य

मुंबई तक

ADVERTISEMENT

Today Horoscope
Today Horoscope
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आज 'या' राशीच्या लोकांना लागणार लॉटरी?

point

'या राशीच्या लोकांना प्रेम व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस आहे खास

point

जाणून घ्या आजच्या राशी भविष्याबाबत सविस्तर माहिती

Today Horoscope 6th September 2024 : भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीत तिथीनुसार आज शुक्रवारचा दिवस आहे. पंचागानुसार, तृतीय तिथई दुपारी 3 वाजून 1 मिनिटांपर्यंत आहे. यानंतर चतुर्थी तिथीला प्रारंभ होतो. याचसोबत आज हरतालिकेची उपवास केला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार, आजच्या दिवशी अनेक राशींच्या व्यक्तींवर भगवान शंकराची कृपा असेल. मेष, वृषभ, कर्क, सिंह, मिथुन, कन्या, तुळा, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन हे राशी भविष्य जाणून घ्या सविस्तर.

मेष 

तुमच्यापैकी काही लोकांना व्यवसाय किंवा विमान प्रवासाचा लाभ होऊ शकतो. छोट्या-मोठ्या समस्यांची चिंता करू नका. ज्यामुळे तुमचं आरोग्य उत्तम राहील आणि मनाला शांती मिळेल. या राशीचे काही लोक अध्यात्मिक गोष्टींकडेही आकर्षित होऊ शकतात. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

वृषभ 

आज तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तींसोबत काही खास क्षण घालवू शकता. पेम व्यक्त करण्यासाठी हा खूप चांगला दिवस आहे. त्यामुळे तुमचं मत प्रेयसी किंवा प्रियकरावर सोपवू नका. छोट्या-मोठ्या समस्या किंवा मूड स्विंग तुमच्या रोमॅन्टिक क्षणांना नुकसान पोहचवू शकते. त्यामुळे कमीत कमी अपेक्षा ठेवा.  

ADVERTISEMENT

मिथुन

ADVERTISEMENT

तुमच्या चांगल्या आर्थिक स्थितीत आहात. तसच तुम्ही नवीन उद्योगात गुंतवणूक करू शकता. तुम्ही पैशांची बचत करण्यातही खूप चांगले आहात. काही लोक अनोख्या जागेवर सुट्ट्या एन्जॉय करू शकता.

हे ही वाचा >> Mumbai Times Tower Fire: टाइम्स टॉवरला भीषण आग! अग्निशमन दलाच्या 9 गाड्या घटनास्थळी दाखल

कर्क राशी

कार्यालयीन कामात कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागू शकतं. अन्य लोकांचा दृष्टीकोन आणि सल्ले लक्षात ठेवले पाहिजेत. एखाद्या वरिष्ठाने दिलेला सल्ला फायदेमंद ठरू शकतो.

सिंह

तुम्ही पूर्ण दिवस स्फूर्ती आणि उत्साहात राहाल. तुमच्यापैकी काजी जण दिवसभर वर्तमानपत्र, पत्रिका वाचण्यात मग्न राहाल. आरोग्याची विशेष काळजी घ्या. 

कन्या राशी 

आज प्रेम व्यक्त करण्यासाठी खास दिवस आहे. तुम्ही तुमच्या प्रियकरासोबत शानदार डिनर पार्टी करू शकता. तसच तुमच्या पार्टनरला एक चांगलं गिफ्टही देऊ शकता. 

तुळा 

तुम्हाला व्यवसायात आर्थिक समस्या जाणवू शकते. कारण तुमच्यापैकी काही लोक नवीन गॅजेट खरेदी करण्यासाठी अधिक खर्च करू शकता. खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.

वृश्चिक

आज वृश्चिक राशीचे लोक नवनवीय योजना सुरु करू शकतात. तसच व्यवसायात, उद्योगत कनेटक्टिव्हीटी वाढवू शकता. आज मैत्रीपूर्ण संबंध बनवण्याचा प्रयत्न करा. 

हे ही वाचा >> Maharashtra Weather: जरा जपून... धो-धो पाऊस बरसणार! IMD चा 'या' जिल्ह्यांना अलर्ट 

धनु राशी

तुम्ही आज तुमच्या मित्रांसोबत आठवड्यातील सुट्टी एन्जॉय करू करून आरोग्य चांगलं ठेवू शकता. तसच तुम्ही जमिनीवर किंवा गवतावर अनवाणी पायाने चालू शकता. 

मकर 

मकर राशींच्या व्यक्तींना ज्या गोष्टींची अपेक्षा आहे, त्याबाबत सावध राहा. कोणतंही काम करताना विचारपूर्वक करा. विवाहित लोकांसाठी आणि इतर गोष्टी व्यवस्थित पार पाडण्यासाठी अधिक वेळ लागू शकतो. 

कुंभ 

आज तुमची आर्थिक स्थिती स्थीर राहील. तुम्ही कुटुंब आणि मित्रांसाठी काही महागड्या वस्तू खरेदी करू शकता. तुमच्यापैकी काही लोक आकर्षक संपत्तीचा सौदाही करू शकता. 

मीन

तुमच्यापैकी बहुतांश लोक आजच्या दिवसाचा आनंद लुटू शकता. काही कामांचं प्लॅन असल्यास रचनात्मक विचार करा. त्यामुळे तुम्हाला प्रेरणा मिळू शकते. विंडो शॉपिंक किंवा एखाद्या प्रदर्शनात भाग घेऊ शकता. 


 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT