मेहुणीने लग्नाला नकार दिला, दीराची तळपायाची आग मस्तकात गेली, वहिनीच्या गळ्यावर ब्लेडने वार करुन संपवलं
Crime News : दीराने आपल्या 20 वर्षीय वहिनीचा गळा चिरुन हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वहिनीचा गळा चिरल्यानंतर दीराने स्वत:चाही गळा चिरुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. 23 वर्षीय आरोपीचं नाव दीपक असं असून उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील ही घटना आहे. दीपकने आपल्या वहिणीची हत्या नेमकी कोणत्या कारणासाठी केली, जाणून घेऊया.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
ब्लेडने वहिनीचा गळा चिरला, घाबरुन स्वत:च्या गळ्यावरही केले वार
'या' कारणामुळे दीर होता नाराज
Crime News : दीराने आपल्या 20 वर्षीय वहिनीचा गळा चिरुन हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वहिनीचा गळा चिरल्यानंतर दीराने स्वत:चाही गळा चिरुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. 23 वर्षीय आरोपीचं नाव दीपक असं असून उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील ही घटना आहे. दीपकने आपल्या वहिणीची हत्या नेमकी कोणत्या कारणासाठी केली, जाणून घेऊया.
नकाराची जुनी खुन्नस
पोलीस तपासात या हत्येमागील धक्कादायक कारण समोर आले आहे. मृत करिश्मा (20) हिचा विवाह चार महिन्यांपूर्वीच दीपकचा मोठा भाऊ प्रमोद याच्याशी एका सामूहिक विवाह सोहळ्यात झाला होता. याच सोहळ्यात करिश्माची बहीणदेखील उपस्थित होती. त्यावेळी दीपकसाठी करिश्माच्या बहिणीला विचारणा करण्यात आली होती, मात्र तिने दीपकला नाकारले होते. हा नकार दीपकच्या जिव्हारी लागला होता. करिश्माने प्रमोदला पसंत केले पण तिच्या बहिणीने आपल्याला नाकारले, याच रागातून तो आपल्या वहिनीचा द्वेष करु लागला होता.
ब्लेडने गळा चिरला
रविवारी (15 फेब्रुवारी) सकाळी घरात कोणात्यातरी कारणावरुन दीपक आणि करिश्मा यांच्यात वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात दीपकने ब्लेडने करिश्माचा गळा चिरला. करिश्माला रक्ताच्या थारोळ्यात तडफताना पाहून दीपक घाबरला आणि त्याने स्वतःजवळ असलेल्या ब्लेडने स्वतःचाही गळा कापून घेतला. घरातील लोकांनी दोघांनाही तातडीने रुग्णालयात नेले, मात्र वाटेतच करिश्माचा मृत्यू झाला. दीपकची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.