Gold Prices Today: गुड न्यूज! आज 24 कॅरेट सोन्याचे भाव कितीने घसरले बघितलं का? 

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आज 24 कॅरेट सोन्याचे भाव कितीने घसरले बघितलं का? 

point

तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?

point

22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?

Gold-Silver Rate : आज (27 ऑगस्ट) सोनं खरेदी करण्याचा विचार करताय? मग, तुमच्यासाठी थोडी दिलासादायक बातमी आहे. कारण, कालच्या तुलनेत (26 ऑगस्ट) आज सोन्याच्या भावात थोडी घसरण झाली आहे. पण, येत्या सणासुदीच्या दिवसांमध्ये देशात सोन्याची मागणी आणखी वाढणार आहे. त्यामुळे हे भाव कायम राहणार नाहीत. या पार्श्वभूमीवर आज सोन्याचे भाव कितीने घसरले जाणून घेऊयात... (gold-silver prices rises today 27 august 2024 on Dahi Handi in maharashtra know the details)

ADVERTISEMENT

Goodreturns वेबसाईटनुसार, सोमवारी (27 ऑगस्ट 2024) 24 कॅरेट 10 ग्रॅम (1 तोळा) सोन्याचा भाव 73, 040 रूपये होता. पण आज यामध्ये 10 रूपयांनी घट झाली असून तो 73, 030 रूपयांवर पोहोचला आहे. तर, 22 कॅरेट सोन्याच्या दरात आणि 18 कॅरेट सोन्याच्या भावात 10 रुपयांनी घसरण झाली आहे. त्याचवेळी, एक किलो चांदीचा भाव गगनाला भिडला आहे. एक किलो चांदीची किंमत आज 600 रूपयांनी वाढली असून 88,500 रूपये इतकी झाली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे भारतात सोने दागिन्यांच्या किंमती बदलत असतात.

हेही वाचा : Sanjay Raut: 'मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, शिवरायांचा असा अपमान मुघलांनीही केला नाही', संजय राऊत संतापले!

तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?

मुंबई

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 66,940 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,030 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54,770 रूपये आहे.

पुणे

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 66,940 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,030 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54,770 रूपये आहे.

नागपूर

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 66,940 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,030 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54,770 रूपये आहे.

नाशिक

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 66,970 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,050 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54,800 रूपये आहे.

22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?

सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो.

हे वाचलं का?

हेही वाचा : Maharashtra weather: बाई... हा काय प्रकार? केवढा तो पाऊस, पुढील 48 तास राज्यासाठी धोक्याचे!

22 कॅरेट सोने, चांदी, निकेल, जस्त आणि तांबे यासह इतर मिश्रधातूंचे दोन भाग एकत्रित करणारे सोन्याचे मिश्रण आहे. 22 कॅरेट सोने हे 24 कॅरेट सोन्यानंतरचे सर्वोत्तम दर्जाचे आहे. तर, 24 कॅरेट सोने हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांना किंवा ज्वेलर्ससाठी उपलब्ध असलेले सर्वात शुद्ध सोने आहे. 24-कॅरेट सोन्यामध्ये तांबे, निकेल, जस्त किंवा चांदी यांसारख्या मिश्र धातुंसह 99.99% सोने असते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT