Maharashtra weather: बाई... हा काय प्रकार? केवढा तो पाऊस, पुढील 48 तास राज्यासाठी धोक्याचे!

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईत पावसाचा अंदाज काय?

point

आज 'या' जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

point

पुढील 48 तास राज्यासाठी धोक्याचे!

Mumbai, Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. मुसळधार पावसाने महाराष्ट्राला पुन्हा एकदा झोडपून काढलं आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. (IMD Predicts today 27 august that Heavy to very Heavy Rainfall in Maharashtra including Mumbai pune konkan west Maharashtra Vidarbha and marathwada)

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर कमी झाला होता. पण, 17 ऑगस्टनंतर महाराष्ट्रात पाऊस वाढला असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने राज्यातील 7 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी केला आहे. आज राज्यातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे हवामान असेल ते सविस्तर जाणून घेऊयात.

हेही वाचा : Ladki Bahin Yojana : 'हे' काम आताच करून घ्या, नाहीतर योजनेचे 4500 गमावून बसाल!

मुंबईत पावसाचा अंदाज काय?

पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज आहे. मुंबई शहर आणि उपनगरात सामान्यतः आकाश ढगाळ राहील आणि मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल. काही वेळा 30-40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 31°C आणि 26°C च्या आसपास असेल.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT


आज 'या' जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

कोकणात हवामान विभागाकडून आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, कोकणातील अनेक जिल्ह्यात आज जोरदार पावसाची शक्यता आहे. तसंच, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा : Dahi Handi: 'गोविंदा आला रे आला'; मुंबई-ठाण्यातील 'या' भागांमध्ये दहीहंडीचे लागणार सर्वात उंच थर! 

विदर्भात आज मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, विजांच्या कडकडाटासह आणि वादळासह पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात देखील आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, विजांचा कडकडाट आणि वादळासह पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

ADVERTISEMENT


 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT