Govt Jobs : भारत सरकारच्या संरक्षण कंपनीत नोकरीची संधी, फक्त मुलाखतीद्वारे होणार निवड

मुंबई तक

भारत सरकारच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती सुरु झाली आहे. यासाठी मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

ADVERTISEMENT

HAL Recruitment
HAL Recruitment
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

भारत सरकारच्या संरक्षण कंपनीत नोकरीची संधी

point

फक्त मुलाखतीद्वारे निवड

HAL Recruitment : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) या भारतातील प्रमुख संरक्षण व एरोस्पेस कंपनीत 'ज्युनियर एक्झिक्युटिव्ह' पदांच्या एकूण 150 जागांसाठी भरती निघाली आहे. याअंतर्गत विविध अभियांत्रिकी शाखांमधील उमेदवारांना संधी उपलब्ध करून देण्यात आली असून, यात मेकॅनिकल शाखेत सर्वाधिक 78 पदे, इलेक्ट्रिकल शाखेत 25 आणि इलेक्ट्रॉनिक्स शाखेत 21 पदे समाविष्ट आहेत. याशिवाय सिव्हिल (07), कॉम्प्युटर सायन्स (06), प्रोडक्शन (06), मेटॅलर्जी (06), एरोनॉटिकल (02) आणि केमिकल (02) अशा विविध शाखांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.

शैक्षणिक पात्रता काय?

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित विषयात किंवा शाखेत किमान 60% गुणांसह B.E. किंवा B.Tech ही शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि दिव्यांग (PWD) प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान गुण 50% ठेवण्यात आले आहेत. वयोमर्यादेच्या अटीनुसार 17 ऑक्टोबर 2026 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 28 वर्षांच्या दरम्यान असावे. शासकीय नियमांनुसार कमाल वयोमर्यादेत SC/ST उमेदवारांना 5 वर्षे, तर OBC उमेदवारांना 3 वर्षांची सूट देण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतात कुठेही सेवा बजावावी लागू शकते.

हे ही वाचा : कोल्हापुरात थरार! भरधाव कंटेनरची तीन दुचाकींना धडक, चौघांचा जागीच मृत्यू

निवड प्रक्रिया आणि वेतन

मुदत करारावर निवड होणाऱ्या या उमेदवारांना 30,000 ते 1,20,000 रुपयांपर्यंत वेतन दिले जाणार आहे. सुरुवातीला उमेदवारांना दरमहा मूळ वेतन 30,000 रु. सोबत तिमाही सुधारित महागाई भत्ता (DA), शहर वर्गवारीनुसार घरभाडे भत्ता (HRA) आणि मूळ वेतनाच्या 35% कॅफेटेरिया भत्ता देय असेल. याशिवाय दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी मूळ वेतनावर 3% वार्षिक वेतनवाढ देखील दिली जाईल. या भरती प्रक्रियेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे उमेदवारांची निवड कोणत्याही लेखी परीक्षेशिवाय, केवळ थेट मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे.

हे ही वाचा : मुंबई : IIT पवई कॅम्पसमध्ये रात्री आगीचा भडका! दोन चिमुकल्यासंह पाचजण होरपळले

'असा' करा अर्ज

या भरतीसाठी केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 ऑक्टोबर आहे. अर्जासाठी सर्वसाधारण (GEN), इतर मागासवर्गीय (OBC) आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) घटकांतील उमेदवारांना 500 रुपये परीक्षा शुल्क भरावे लागेल, तर SC/ST/PWD प्रवर्गातील उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वी HAL च्या अधिकृत संकेतस्थळावरून (hal-india.co.in) ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.