Govt Jobs : 10 वी उत्तीर्णांना डाक विभागात नोकरीची संधी, कसा कराल अर्ज?
भारतीय डाक विभागात विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. उमेदवारांची शैक्षणिक पात्रता किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ही संपूर्ण अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पार पडणार आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
10 वी उत्तीर्णांना डाक विभागात नोकरीची संधी
कसा कराल अर्ज?
GDS Recruitment : भारतीय डाक विभागात ग्रामीण डाक सेवक (GDS) अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. नवीन भरती प्रक्रियेमुळे सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या भरती मोहिमेद्वारे ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) आणि डाक सेवक या तीन प्रमुख पदांवर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. संपूर्ण भारतामध्ये ही भरती आयोजित केली जात असून, एकूण पदसंख्या लवकरच अधिकृत संकेतस्थळावर घोषित केली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता काय?
या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याशिवाय, अर्जदाराकडे संगणकाचे बेसिक ज्ञान असणे आणि सायकल चालवता येणे अनिवार्य आहे. वयोमर्यादेचा विचार करता, 19 सप्टेंबर रोजी उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे. शासकीय नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत देण्यात आली असून, अनुसूचित जाती (SC) व अनुसूचित जमाती (ST) उमेदवारांना 5 वर्षे, तर इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांना 3 वर्षे सवलत लागू असेल.
हे ही वाचा : 'अदाणी-अंबानीच्या हातात गणपती देऊन, आम्ही गरबा बघायचा का?', मनसे नेते लालबाग आणि चिंतामणी मंडळावर संतापले!
वेतन किती?
निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या पदानुसार आकर्षक वेतनश्रेणी (TRCA Slab) दिली जाईल. यामध्ये ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) पदासाठी महिना 12,000/- ते 29,380/- आणि असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) तसेच डाक सेवक पदासाठी महिना 10,000/- ते 24,470/- वेतन मिळणार आहे. या भरतीसाठी अर्ज शुल्क 100 रुपये ठेवण्यात आले असून, हे शुल्क केवळ जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांनाच भरावे लागेल. महिला, SC, ST, PWD आणि ट्रान्सवुमन उमेदवारांना अर्ज शुल्कातून पूर्ण सूट देण्यात आली आहे.
हे ही वाचा : कौटिल्य ॲकॅडमीची डील, तरुणीच्या बॉयफ्रेंडसह बापही अटकेत, MPSC पेपरफुटीची Inside Story
अर्ज कसा करावा?
ही संपूर्ण अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पार पडणार आहे. उत्सुक आणि पात्र उमेदवारांनी 31 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर 2026 दरम्यान एक-वेळ नोंदणी (One-Time Registration) पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यानंतर 2 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर या कालावधीत अंतिम अर्ज सादर करायचा आहे. सबमिट केलेल्या अर्जात काही चुका असल्यास त्या सुधारण्यासाठी 23 आणि 24 सप्टेंबर रोजी एडिट विंडो उपलब्ध करून दिली जाईल. उमेदवारांनी मुदतीचा विचार करून वेळेत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
