Govt Jobs : BHEL मध्ये विविध पदांसाठी भरती, ट्रेनिंगमध्येच मिळणार 50 हजार पगार

भारत हेवी इलेक्ट्रिकल्समध्ये विविध पदांसाठी भरती सुरु झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 डिसेंबर आहे.

ADVERTISEMENT

BHEL Recruitment
BHEL Recruitment
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

BHEL मध्ये विविध पदांसाठी भरती

point

जाणून घ्या पात्रतेचे निकष

BHEL Recruitment : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) मध्ये मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. BHEL मार्फत इंजिनिअर ट्रेनी, एक्झिक्युटिव्ह ट्रेनी आणि सुपरवायझर ट्रेनी या पदांसाठी एकूण 415 जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये इंजिनिअर/एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदांच्या 200 जागा, तर सुपरवायझर ट्रेनी पदांच्या 215 जागांचा समावेश आहे. या भरतीसाठी 25 नोव्हेंबर 2026 पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 28 डिसेंबर 2026 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

पात्रतेचे निकष काय?

या भरतीमध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल, आयटी/कॉम्प्युटर सायन्स, एचआर आणि फायनान्स अशा विविध विभागांमध्ये पदे भरली जाणार आहेत. पदानुसार उमेदवारांकडे इंजिनिअरिंगमधील पदवी किंवा डिप्लोमा, संबंधित विषयातील पदवी, एचआरमधील पदव्युत्तर शिक्षण किंवा सीए/सीएमए ही शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. उमेदवारांचे वय 1 नोव्हेंबर 2026 रोजी मोजले जाणार असून पदानुसार कमाल वयोमर्यादा 27 ते 29 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. अर्जासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 1072 रुपये, तर काही राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 472 रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

हे ही वाचा : पुणे : सुनावणी संपवून बाहेर येताच गेम केला! मंदार किवळेवरील क्रूर हल्ल्यामागं नेमकं कारण काय?

पगार किती मिळणार?

निवड प्रक्रियेमध्ये पदानुसार संगणक आधारित परीक्षा (CBE), मुलाखत आणि कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. या भरतीची संभाव्य परीक्षा 27 जानेवारी 2027 रोजी होणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना एक वर्षाचे प्रशिक्षण दिले जाईल. इंजिनिअर/एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदासाठी प्रशिक्षणादरम्यान दरमहा 50 हजार रुपये मूळ वेतन मिळेल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर इंजिनिअर किंवा एक्झिक्युटिव्ह म्हणून नियुक्ती केली जाईल. त्यावेळी मूळ वेतन 60 हजार रुपये असेल. या पदासाठी वार्षिक सीटीसी (CTC) अंदाजे 12 लाख रुपये आहे.

हे ही वाचा : Pune: मंदार किवळेवरील हल्ल्यानंतर रोहित पवारांचा भाजपला सवाल; 'नव्या पुण्याचे शिल्पकार काय बोलणार?'

अर्ज कसा कराल?

सुपरवायझर ट्रेनी पदासाठी प्रशिक्षणादरम्यान दरमहा 32 हजार रुपये मूळ वेतन दिले जाईल. एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुपरवायझर पदावर नियुक्ती केली जाईल. त्यावेळी मूळ वेतन 33 हजार 500 रुपये असेल. या पदासाठी वार्षिक सीटीसी अंदाजे 7.5 लाख रुपये आहे. निवड झालेल्या उमेदवारांना भारतभरातील BHEL चे विविध युनिट्स आणि प्रकल्पस्थळांवर काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीची सविस्तर जाहिरात वाचावी आणि अधिक माहितीसाठी BHEL च्या अधिकृत वेबसाइट careers.bhel.in ला भेट द्यावी.