Govt Jobs : IBPS कडून 11,403 जागांची मेगा भरती जाहीर, काय आहेत पात्रतेचे निकष?
बँकिंग क्षेत्रात करिअर करु इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. IBPS ने 11,403 जागांसाठी भरती जाहीर केली आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 21 ऑगस्ट आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
Govt Jobs : IBPS कडून 11,403 जागांची मेगा भरती जाहीर
काय आहेत पात्रतेचे निकष?
IBPS Recruitment : बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. IBPS मार्फत देशाभरातील विविध सहभागी बँकांमध्ये लिपिक (Customer Service Associate - CSA) पदाच्या तब्बल 11,403 जागांसाठी भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतात कुठेही नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 21 ऑगस्ट आहे.
शैक्षणिक पात्रता
या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. यासोबतच संगणक साक्षरता अनिवार्य करण्यात आली असून, उमेदवाराकडे संगणक विषयात प्रमाणपत्र, डिप्लोमा किंवा पदवी असावी अथवा हायस्कूल किंवा कॉलेजमध्ये संगणक हा एक विषय म्हणून अभ्यासलेला असावा. वयोमर्यादेच्या अटीनुसार 1 ऑगस्ट 2026 रोजी उमेदवाराचे वय 20 ते 28 वर्षांच्या दरम्यान असावे. शासकीय नियमांनुसार अनुसूचित जाती व जमाती (SC/ST) प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे, तर इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांना 3 वर्षे वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
हे ही वाचा : "दुसऱ्यांनाही आई असते, हे तुमच्या पक्षातील लोकांना...", राज ठाकरेंचं पीएम मोदींना प्रत्युत्तर
अर्जाची अंतिम मुदत
भरती प्रक्रियेसाठी खुला आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क 850 रुपये ठेवण्यात आले आहे; तर अनुसूचित जाती, जमाती, दिव्यांग आणि माजी सैनिकांसाठी हे शुल्क 175 रुपये असणार आहे. सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांना 21 ऑगस्ट 2026 पर्यंत अधिकृत संकेतस्थळावर (www.ibps.in) जाऊन ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज सादर करता येतील. परीक्षा शुल्काचा भरणा देखील ऑनलाईनच करायचा आहे.
हे ही वाचा : "मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरील फिंगरप्रिंट्स बघायचेत", राज ठाकरेंनी तंत्रशिक्षण मंत्र्यांची काढली पिसं
पगार किती मिळणार?
निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षित करणारी उत्कृष्ट वेतनश्रेणी 24,050 ते 64,480 रुपये महिना आणि नियमानुसार इतर भत्ते देखील लागू असणार आहेत. या भरतीसाठी पूर्व-परीक्षा प्रशिक्षण (PET) सप्टेंबर 2026 मध्ये आयोजित केले जाईल. त्यानंतर मुख्य निवड प्रक्रियेतील टप्पा असलेली पूर्व परीक्षा ऑक्टोबर 2026 मध्ये पार पडणार असून, यामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची मुख्य परीक्षा डिसेंबर 2026 मध्ये घेतली जाणार आहे. बँकिंग क्षेत्रात उज्ज्वल भविष्य घडवू इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
