Gunaratna Sadavarte : “दिशाभूल करू नका”, सदावर्ते जरांगेंवर भडकले; सगेसोयरेचा घोळ काय?
सरकारने अधिसूचना काढली. मात्र, सगेसोयरे ही तरतूद कायद्यात आधीच आहे. सरकारने काढलेल्या अधिसूचनेत नवीन काहीही नाही, असे सदावर्ते यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा हवाला देत सांगितले.
ADVERTISEMENT

News about Gunaratna Sadavarte : सगेसोयरे शब्दाची व्याख्या करणारा अध्यादेश काढावा अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली होती. अध्यादेशापूर्वी सरकारने अधिसूचना काढली. मात्र, सगेसोयरे ही तरतूद कायद्यात आधीच आहे. सरकारने काढलेल्या अधिसूचनेत नवीन काहीही नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंठपीठाने दिलेल्या निकालामुळे मराठवाड्यातील एकाही कुणबी बांधव मागास नाहीत”, असे सांगत गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांच्यावर संताप व्यक्त केला.
सरकारने अधिसूचना काढल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले. त्यावर गुणरत्न सदावर्ते म्हणाले, “मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंठपीठाचे न्यायमूर्ती व्ही.एच. मार्लापल्ले यांनी स्पष्टपणे निकाल दिलेला आहे की, मराठवाड्यातील कुणबी हे मागास नाहीत. तसा कायदा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की, सरकार असो वा जरांगे, हे कायद्यापेक्षा मोठे नाहीत. त्याच्यामुळे डंके की चोट पे चर्चा होऊ शकते. अशा नोटिसा दिल्या जाऊ शकतात. परंतु कोणत्याही प्रकारे कुणीही अधिकारी आधी मार्लापल्लेंचा निकाल बघेल आणि त्याच्यानंतरच प्रमाणपत्र देईल”, असे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे.
‘3 हजार 700 प्रमाणपत्र सुद्धा दिली जाऊ शकत नाही”
सदावर्ते पुढे म्हणाले की, “कालपासून जरांगे बोलत होता की, ३७ लाख प्रमाणपत्र वाटण्यात आले. ३ हजार ७०० प्रमाणपत्र सुद्धा दिली जाऊ शकत नाही. हे ३७ लाख प्रमाणपत्र सर्वोच्च न्यायालयाचा जो पहिला निकाल लागला म्हणजे ओबीसींच्या संदर्भात ते हे प्रमाणपत्र आहेत. त्याच्यामुळे दिशाभूल करून घेऊ नये. आणि अशा प्रकारच्या स्टंटबाज आंदोलकांवर बोलून वेळ वाया घालवण्यात अर्थ नाही.”
हेही वाचा >> फडणवीसांनी जरांगेंचं केलं अभिनंदन, छगन भुजबळांनाही दिला मेसेज
सगे सोयरे शब्दाची व्याख्या हा मुद्द्यावर गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, “ते आधीपासूनच कायद्यात आहे, रक्ताचे नातेवाईक. आजोबा कोण आहे? बाप कोण आहे? चुलत भाऊ कोण आहे, रक्ताचा नातेवाईक आहे की दूरचा नातेवाईक आहे? काही नवीन नाही, सगळं जुनंच आहे. कायद्यात आहे. त्यामुळे यामध्ये कुणी फार हुरळून जाण्याची गरज नाही.