महाराष्ट्राच्या गळ्यातील ताईत बनलेला बिरदेव डोणेची UPSC मार्कशीट पाहिली का?, मिळाले 'एवढे' Marks
UPSC परीक्षेत 551 रँक मिळवून मोठ यश मिळवलेला बिरदेव डोणे हा प्रचंड चर्चेत आहे. जाणून घ्या बिरदेव डोणेला नेमके किती मार्क मिळाले. पाहा त्याची UPSC परीक्षेची मार्कशीट.
ADVERTISEMENT

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील यमगे गावातील मेंढपाळ कुटुंबातील बिरदेव सिद्धप्पा डोणे याने यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा (UPSC CSE) 2024 मध्ये ऑल इंडिया रँक (AIR) 551 मिळवला. त्याच्या या यशाने सामाजिक आणि आर्थिक मर्यादांवर मात करत यश मिळवण्याची प्रेरणा अनेकांना मिळाली आहे. दरम्यान, आता बिरदेव डोणे याची नेमकी मार्कशीट समोर आली आहे. बिरदेवला परीक्षेत किती मार्क मिळाले याबाबत आम्ही आपल्याला नेमकी माहिती देणार आहोत.
बिरदेव डोणेचा यशस्वी प्रवास
बिरदेव सिद्धप्पा डोणे याचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील यमगे गावात एका मेंढपाळ कुटुंबात झाला. त्याचे वडील, सिद्धप्पा डोणे, मेंढ्या आणि शेळ्या पाळून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आर्थिक अडचणी आणि सामाजिक मर्यादांमुळे बिरदेव याला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला, परंतु त्याने आपली जिद्द आणि मेहनत कायम ठेवली.
हे ही वाचा>> Archit Dongre Marksheet: UPSC मध्ये महाराष्ट्रात पहिला आलेल्या पुण्याच्या अर्चित डोंगरेची मार्कशीट आणि पाहून तुम्हीही...
शिक्षण: बिरदेवने प्राथमिक शिक्षण मराठी माध्यमाच्या शाळेत पूर्ण केले. त्यानंतर, त्याने पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी मिळवली. त्याच्या शैक्षणिक उत्कृष्टतेमुळे त्याला दिल्लीत यूपीएससीच्या तयारीसाठी जाण्याची संधी मिळाली.
यूपीएससी तयारी: बिरदेवने दिल्लीत दोन वर्षे यूपीएससीची तयारी केली. त्याला पहिल्या दोन प्रयत्नांमध्ये अपयश आले, परंतु हार न मानता तिसऱ्या प्रयत्नात AIR 551 मिळवला. त्याने समाजशास्त्र (Sociology) हा वैकल्पिक विषय निवडला होता.