Wagh Nakh : ‘ती’ वाघनखे शिवाजी महाराजांची नाहीत -इतिहास संशोधक सावंत

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Historian Indrajit Sawant On Chhatrapati Shivaji maharaj wagh nakh controversy.
Historian Indrajit Sawant On Chhatrapati Shivaji maharaj wagh nakh controversy.
social share
google news

Shivaji Maharaj Wagh Nakh Marathi : छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी वापरलेली वाघनखे ही लंडनच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियममध्ये असल्याचे सांगितले जाते. राज्य सरकारला केवळ तीन वर्षांसाठी दिले जाणार आहेत. नोव्हेंबरमध्ये ही वाघनखे मुंबईत आणली जाणार आहेत. तेथून सातारा, नागपूर आणि कोल्हापूर येथे देखील या नखाचं प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. पण, ही वाघनखं खरी आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासंदर्भात कोल्हापुरातील इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी या वाघनखासंदर्भात अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

शिवाजी महाराज वाघनखे : इ.स. 1919 पर्यंत होती स्पष्टता

इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी या वाघनखासंदर्भात म्हटलं आहे की, अफजल खानाच्या वधाच्या वेळेला जी वाघनखे नावाचं शस्त्र छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलं ते शस्त्र कुठलं आहे आणि कुठे आहे याविषयीची स्पष्टता इ.स. 1919 पर्यंत होती. हे शस्त्र सातारा छत्रपतींच्या शिलेखान्यात होतं. त्याविषयीच्या नोंदी देखील उपलब्ध आहेत. मात्र आता जे व्हिक्टोरिया अण्ड अल्बर्ट म्युझियममध्ये असलेली वाघनखे सरकार भारतात परत आणत आहेत ती अफजल खानाचा वध केलेली वाघनखे नाहीत, हे स्पष्ट आहे.

‘ती’ वाघनखे खरी असल्याची नोंद नाही

इ.स. 1818 मध्ये इंग्रजांनी दुसरा बाजीराव यांच्या पराभवानंतर सातारा छत्रपतींच्या गादीवर प्रतापसिंह महाराज यांना बसवलं होत. त्या महाराजांनी जेम्स कनिंगहॅम ग्रॅण्ट डफ नावाच्या इतिहासकाराला, ज्यांनी मराठ्यांचा इतिहास लिहिला आणि जो साताऱ्याचा रेसिडेंट सुद्धा होता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Wagh Nakh History : छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे लंडनमध्ये कशी पोहोचली?

प्रतापसिंह महाराजांची त्यांच्याशी चांगली मैत्री होती. त्यांना भेट म्हणून वाघनखे देण्यात आली होती. ती वाघनखे व्हिक्टोरिया अॅण्ड अल्बर्ट म्युझियममध्ये ही ग्रॅण्ट डफ यांचा वंशज अंड्रियन ग्रॅण्ट डफ यांनी तेथे दिले असून, तशी स्पष्ट नोंद म्युझियमच्या कॅटलॉगमध्ये उपलब्ध आहेत.

त्या वाघनखाच्या लेबलवर देखील उल्लेख असून, संग्रहालयाच्या कॅटलॉगमध्ये देखील ती वाघनखे ही छत्रपती शिवाजी महाराजांचे अस्सल वाघ नखे असल्याची अशी कोणतीही नोंद नाही, असं असे इंद्रजित सावंत यांचा दावा आहे.

इ.स.1919 पर्यंत वाघ नखे साताऱ्यात, तर मग म्युझियम मधील वाघनखे कोणती?:

इंद्रजित सावंत असं म्हणालेत की, जर अफजल खानाच्या वधाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे ही जर इ.स.1919 पर्यंत साताऱ्यात असलेल्याच्या नोंदी आणि छायाचित्र आहेत. तर मग तर मग इ.स 1919 च्या अगोदरच म्हणजे विक्टोरिया अॅण्ड अल्बर्ट म्युझियम जमा झालेलं वाघनखे ही शिवछत्रपतींचे असू शकत नाही, असा दावा इंद्रजित सावंत यांनी केला आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Shiv Sena च्या युती-आघाडीचा काय आहे इतिहास, कसं वापरलंय धक्कातंत्र?

“सरकारकडून छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेलली वाघनखे आम्ही परत आणतोय ही जी काय कथा रचली जात आहे. ती पुर्णपणे खोट असून हे इतिहासाच्या आणि इतिहास लेखन शास्त्राच्या कसोटीवर टिकत नाही. आमच्यासारख्या संशोधकांनी आम्ही त्याच्या विषयीचा रिसर्च करून शोध निबंध लिहिले आहेत. मात्र शासन नवीनच कुठला तर शोध लावतेय आणि शिवछत्रपतींची नसणारी गोष्ट शिवछत्रपतींची आहे असं सांगत आहे. ही जनतेची दिशाभूल करायची गोष्ट आहे. ती शासनाने थांबावी आणि जर त्यांच्याकडे या संदर्भातले पुरावे असतील तर शासनाने जनतेसमोर आणावेत”, अशी भूमिका इंद्रजित सावंत यांनी मांडली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT