पत्नी पतीच्या छातीवर बसली! प्रियकराला म्हणाली, सोडू नको नवऱ्याला..प्रायव्हेट पार्टला दांडकाने मारलं अन् नंतर घडलं..
Today Shocking News Viral : 1 सप्टेंबरची मध्यरात्र..एक व्यक्ती भाड्याच्या घरात शांत झोप घेत होता. अचानक एका व्यक्ती त्याच्या छातीवर बसला आणि त्याचा गळा दाबत होता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

याला संपवून टाक..सोडू नको सिद्धू..

घरमालकाने वाचवला जीव

पत्नीचे होते अनैतिक संबंध
Today Shocking News Viral : 1 सप्टेंबरची मध्यरात्र..एक व्यक्ती भाड्याच्या घरात शांत झोप घेत होता. अचानक एका व्यक्ती त्याच्या छातीवर बसला आणि त्याचा गळा दाबत होता. ही धक्कादायक स्टोरी अशा एका पतीची आहे, ज्याच्यासोबत पत्नीनेच हत्येचा कट रचला होता. पण या प्रकरणामागे कारण काय होतं? जाणून घेऊयात हे प्रकरण नेमकं आहे तरी काय...
ही धक्कादायक घटना कर्नाटकच्या विजयपूरा जिल्ह्यातील इंडी कस्बे येथे घडली. एका भाड्याच्या घरात बीरप्पा पुजारी नावाचा व्यक्ती गाढ झोपेत होता. अचानक त्याला जाग आली, कारण त्याच्या छातीवर एक व्यक्ती बसला होता. तो त्याचा गळा दाबत होता. त्याची हत्या करण्याचा प्रयत्न करत होता. दुसरा व्यक्ती त्याच्या पायाजवळ बसून त्याच्या प्रायव्हेट पार्टवर दांडकाने हल्ला करत होता आणि त्याचा खून करण्याचा प्रयत्न करत होता.
याला संपवून टाक..सोडू नको सिद्धू..
बीरप्पाने जसे डोळे उघडले, तेव्हा पाहिलं की, घरातील सर्व लाईट्स बंद होत्या. तेव्हा त्याचा पाय कुलरला लागला आणि मोठा आवाज झाला. या आवाजामुळे तो मृत्यूच्या दाढेतून परत आला. बीरप्पाने स्पष्ट ऐकलं की, त्याची पत्नी सुनंदा पुजारी तिच्या प्रियकराला हत्या करण्यासाठी आदेश देत होती. याला संपवून टाक..सोडू नको सिद्धू, असं ती म्हणत होती.
हे ही वाचा >> Nano Banana Trend: Viral 3D फोटो नेमका कसा तयार करायचा? सोप्पंय खूप.. 'या' Tips लक्षात ठेवा अन् 1 मिनिटात...
घरमालकाने वाचवला जीव
याचदरम्यान, घरमालक मल्लिकार्जुन सुतार आणि त्याची पत्नी राजेश्वरी शोर आवाज ऐकून घराच्या बाहेर आले आणि दरवाजा ठोकू लागले. बीरप्पाचा मुलगा राकेशने रडत रडत दरवाजा उघडला, तेव्हा सुनंदा धावत बाहेर आली आणि घरमालकाला रोखण्याचा प्रयत्न केला. तिने त्यांना धक्का देत पळवून लावलं. तेव्हा बीरप्पाने पाहिलं की, त्या गळा दाबणारा व्यक्ती सिदप्पा कटानाकेरी होता.
पत्नीचे होते अनैतिक संबंध
या व्यक्तीसोबत त्याच्या पत्नीचे अनैतिक संबंध होते. ज्यामुळे घरात नेहमीच भांडण व्हायचं. त्यावेळी रुममध्ये सिदप्पासोबत आणखी एक व्यक्ती होता. ज्याने चेहऱ्यावर कपडा बांधला होता. हल्लेखोरांनी बीरप्पाला धमकीही दिली होती. बीरप्पा गंभीररित्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
हे ही वाचा >> Uddhav-Raj Thackeray: 'तू परत ये.. मला भेटायला!', उद्धव ठाकरेंना 'शिवतीर्था'वर पुन्हा कोणी आणि का बोलावलेलं? अखेर आलं समोर!
या प्रकरणाचा तपास सुरु
पोलिसांनी सुनंदाला अटक केली आहे. तर प्रियकर सिद्दप्पा फरार आहे. विजयपूराचे एसपी लक्ष्मण निंबर्गी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीचा शोध सुरु आहे. या धक्कादायक घटनेमुळं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.