केसांना करायचंय सिल्की अन् शायनी? घरच्या घरी करा असा हेअर स्पा...
Hair spa home remedies : हेअर स्पामध्ये केस चांगले धुऊन मसाज केला जातो. यामुळे केसांना ताकद आणि पोषण मिळते.
ADVERTISEMENT
▌
बातम्या हायलाइट
हेअर स्पामध्ये केस चांगले धुऊन मसाज केला जातो.
यामुळे केसांना ताकद आणि पोषण मिळते
तुम्हीही हे घरी सहज करू शकता
हेअर स्पामध्ये केस चांगले धुऊन मसाज केला जातो. यामुळे केसांना ताकद आणि पोषण मिळते.
मुली अनेकदा पार्लरमध्ये जाऊन हेअर स्पा करण्यासाठी पैसे खर्च करतात. पण तुम्ही ते घरीही सहज करू शकता.
हेअर स्पा घरी करण्यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
सर्वात आधी केसांना तेल लावा. केसांना नारळ, ऑलिव्ह किंवा बदामाचे तेल लावू शकता.
तेल लावल्यानंतर केसांना स्टीम द्या. फक्त 10 मिनिटे स्टीमिंग करा. जास्त वाफेमुळे केस खराब होतात.
त्यानंतर केस शॅम्पूने धुवा. यानंतर हेअर मास्क लावा. केळी, फ्लॅक्ससीड आणि अंड एकत्र करून 15 मिनिटांसाठी केसांना लावा.
शेवटच्या टप्प्यात, केस सौम्य शाम्पूने चांगले धुवा. नंतर केस सुकल्यानंतर सीरम लावा. हेअर स्पा केसांमधील कोंडा पूर्णपणे दूर करतो. तसेच केसांमध्ये घाण साचू देत नाही.
हेअर स्पामुळे केस गळणे कमी होते आणि ते मजबूत होतात. टाळूवरील केस तुटण्याची समस्या दूर होते. हेअर स्पा केसांना सिल्की आणि शायनी करते. हे केसांना आतून मॉइश्चरायझ करते.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT