Maharashtra Weather: महाराष्ट्राला पाऊस पुन्हा झोडपणार! IMD चा 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे.

point

मुंबई आणि पालघरमध्येही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

point

IMD चा 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी!

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. अशावेळी अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार आज (26 ऑगस्ट) काही जिल्ह्यांना रेड अलर्टही जारी करण्यात आला आहे. यामुळे आज तुमच्या जिल्ह्यात हवामानाची स्थिती कशी असणार? जाणून घेऊयात. (IMD alert maharashtra Weather live update news mumbai pune weather report today 26 august 2024 )

ADVERTISEMENT

मुंबई आणि पालघरमध्येही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. राज्याच्या किनारपट्टीच्या भागात ताशी 35 ते 55 कि.मी. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आज राज्यातील अनेक भागांमध्ये हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावासाचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचं आवाहान करण्यात आलं आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : Cabinet Meeting : केंद्राच्या UPS च्या धर्तीवर महाराष्ट्रात सुधारीत पेन्शन योजना लागू, कुणाला फायदा होणार?

IMD चा 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी!

कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी  मुसळधार ते अतिमुसळधार आणि अत्यंतमुसळधार  पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा : Viral News : ''आप्पाचा विषय लय हार्ड ए, आप्पाकडे मागितला OTP पण...'', मुंबई पोलिसांची हटके जनजागृती

दरम्यान महाराष्ट्रासोबतच गुजरात, दिल्ली, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT