CID फेम फ्रेडरिकला हार्ट अटॅक, मृत्यूशी देतोय झुंज दिनेश फडणीस

मुंबई तक

ADVERTISEMENT

Inspector Federix Dinesh Phadnis from cid tv serial heart attack doctor puts him ventilator
Inspector Federix Dinesh Phadnis from cid tv serial heart attack doctor puts him ventilator
social share
google news

CID TV Show: सीआयडी या लोकप्रिय टीव्ही मालिकेतील इन्स्पेक्टर फ्रेडरिक्स उर्फ ​​दिनेश फडणीस (Fredericks alias Dinesh Phadnis) यांच्याबद्दल एक दु:खद बातमी समोर आली आहे. अभिनेता दिनेश फडणीस सध्या जीवन आणि मरण यांच्यातील लढाई लढत आहे. कारण दिनेशला हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला असून त्याला आता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.(Inspector Federix Dinesh Phadnis from cid tv serial heart attack doctor puts him ventilator)

ADVERTISEMENT

दयानंद शेट्टीने दिली माहिती

दिनेश फडणीस यांना हृदयविकाराचा झटका आला असून त्यांना तातडीने मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. कलाकार दयानंद शेट्टी यांनी ही माहिती दिली असून त्यांनी त्यांच्यावर सध्या उपचार सुरु असल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. सीआयडीमध्ये दया ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या दयानंद शेट्टी यांनी दिनेश फडणीस यांच्यावर चाललेल्या उपचाराबद्दल त्यांच्या चाहत्यांना माहिती दिली आहे.

हे ही वाचा >> सत्तेची मुजोरी! भाजप आमदाराने अधिकाऱ्यावर हात उगारला, नेमकं प्रकरण काय?

चाहत्यांनी केली प्रार्थना

अभिनेता दयानंद शेट्टी यांनी सांगितले की, त्यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाल्याचेही त्यांनी सांगितले. डॉक्टरांनी सुरु केलेल्या उपचाराला ते उत्तम प्रतिसाद देत असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच या आजारातून ते लवकरात लवकर बाहेर पडावे यासाठी आम्ही सर्व प्रार्थना करत असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. कलाकार दिनेश फडणीस यांच्या या बातमीमुळे अनेकांना धक्का बसला आहे. त्यामुळे अनेक जण त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे.

हे वाचलं का?

दिनेशने साकारल्या अनेक भूमिका

नव्वदच्या दशकापासून लोकप्रिय झालेल्या ‘सीआयडी’मालिकेमध्ये दिनेश फडणीस यांनी इन्स्पेक्टरची भूमिका साकारली होती. त्यांची ती भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या मालिकेमध्ये त्यांनी कित्येक वर्षे भूमिका केली. त्याचबरोर ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्येही त्यांच्या अभिनय दिसून आला होता. ते अभिनयाबरोबरच त्यांनी काही मराठी चित्रपटांसाठीही पटकथा लिहिण्याचे काम केले आहे.

हे ही वाचा >> Election Results 2023: निकालानंतर संजय राऊत रोखठोकच बोलले, ‘काँग्रेसला आता…’

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT