ISRO: सूर्याच्या उष्णतेने Aditya-L1 भस्म होणार नाही?, ISRO च्या तज्ज्ञांची भन्नाट शक्कल!
What is Lagrange Point: चंद्रानंतर आता सूर्यावर झेप घेण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. यासाठी इस्त्रोने आदित्य L1 मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून आता सूर्याचा अभ्यास केला जाणार आहे.
ADVERTISEMENT
What is Lagrange Point: चंद्रानंतर आता सूर्यावर झेप घेण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. यासाठी इस्त्रोने आदित्य L1 मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून आता सूर्याचा अभ्यास केला जाणार आहे. दरम्यान चांद्रयानला थेट चंद्रावर पाठवण्यात आले होते, त्याप्रमाणेच आदित्य L1 थेट सुर्यावर पाठवता येणार आहे का? सूर्याच्या उष्णतेसमोर आदित्य भस्म होणार का? हा L1पॉईंट कुठे आहे? या सर्व गोष्टींची माहिती जाणून घेऊयात. (isro aditya l1 mission what is lagrange point know about all the mission details)
ADVERTISEMENT
‘या’ दिवशी आकाशात झेपावणार
इस्त्रो 2 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11.50 वाजता आदित्य-L1 मिशन लाँच करणार आहे. चांद्रयानप्रमाणे श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून आदित्य-L1 सूर्याच्या दिशेने झेपावणार आहे. आदित्यच्या प्रक्षेपणासाठी PSLV-XL रॉकेटचा वापर केला जात आहे. ज्याचा क्रमांक PSLV-C57 आहे. या मोहिमेच्या माध्यमातून आदित्य L1 सुर्याचा अभ्यास करणार आहे.
हे ही वाचा : Ranjit Naik-Nimbalkar: वहिनी-दादाची आत्महत्या, भावाने बोट छाटलं.. BJP खासदाराला अटक होणार?
या मोहिमेत आदित्य-एल1 1.5 दशलक्ष किलोमीटरचा प्रवास करणार आहे. याचाच अर्थ आदित्य सूर्यापासून 14 कोटी 85 लाख किलोमीटर दूर असणार आहे, तर पृथ्वीच्या जवळ असेल. तर 1.5 दशलक्ष किलोमीटरचे अंतर चंद्राच्या अंतरापेक्षा चारपट जास्त आहे. विशेष म्हणजे आदित्य-एल1 सूर्यापासून इतक्या दूर स्थितीत असून सु्द्धा त्याला उष्णतेच्या झळा बसणार आहेत पण त्याचा स्फोट होणार नाही आहे.
हे वाचलं का?
लँग्रेज पॉईंट1 म्हणजे काय?
सूर्य आणि पृथ्वी या दोन्हीच्या आत गुरुत्वाकर्षण आहे. सूर्याचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीपेक्षा जास्त आहे. पण एका विशिष्ट टप्प्यावर दोघांमधील गुरुत्वाकर्षण एकमेकांना संतुलित करते. याचा अर्थ असा की या पॉइंटमधून जाणाऱ्या कक्षेत एखादी सॅटेलाइट ठेवली तर सूर्य किंवा पृथ्वी दोघेही त्याला स्वतःकडे खेचणार नाहीत. सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील सरळ रेषेवर असेच पाच पॉइंट निश्चित केले आहेत.
गणितज्ञ जोसेफ-लुई लॅग्रेंज यांच्या नावावरून त्यांना लॅग्रेंज पॉइंट्स म्हणतात. L1 त्यापैकी एक आहे. L1 बिंदू पृथ्वीपासून सुमारे 1.5 दशलक्ष किलोमीटर दूर आहे. हे अंतर पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील अंतराचा शंभरावा भाग आहे. L1 चा फायदा असा आहे की त्यातून जाणार्या कक्षेत फिरणारी वस्तू (ज्याला हॅलो ऑर्बिट म्हणतात) सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहणात लपत नाही.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Student Suicide : CID मध्ये झालेली निवड, पण.. 22 वर्षीय तरुणीने का संपवलं आयुष्य?
इस्रोच्या म्हणण्यानुसार, सूर्यातून बाहेर पडणारे आणि पृथ्वीच्या दिशेने जाणारे सौर वादळ देखील L1 मधून जाते. त्यामुळेच आदित्य-एल1 मोहिमेसाठी सॅटेलाइटला एल1 मधून जाणाऱ्या हॅलो कक्षेत लॉन्च करण्यात येणार आहे. ते या कक्षेत राहून सूर्याची माहिती सतत गोळा करेल.
ADVERTISEMENT
मिशन कसे पुर्ण होणार?
आदित्य-L1आपल्या प्रवासाची सुरूवात लोअर अर्थ ऑर्बिट (LEO) पासून करणार आहे. पीएसएलव्ही-एक्सएल रॉकेट आदित्यला LEO मध्ये सोडेल. यानंतर, तीन किंवा चार कक्षा चालवल्यानंतर, ते थेट पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्राच्या म्हणजेच प्रभाव क्षेत्राच्या (SOI) बाहेर जाईल. त्यानंतर क्रूझचा टप्पा सुरू होईल.
आदित्य-एल1 हे हॅलो ऑर्बिटमध्ये (Halo Orbit) मध्ये ठेवण्यात येईल. L1 बिंदू हा सूर्य आणि पृथ्वी यांच्यात स्थित आहे. पण सूर्यापासून पृथ्वीच्या अंतराच्या तुलनेत ते फक्त 1 टक्के आहे. या प्रवासात 127 दिवस लागणार आहेत. हे अवघड यासाठी आहे, कारण त्याला दोन मोठ्या कक्षेत जावे लागणार आहे. पहिली अवघड कक्षा म्हणजे पृथ्वीच्या SOI च्या बाहेर जाणे. कारण पृथ्वी आपल्या गुरुत्वाकर्षण शक्तीने आपल्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट खेचते. यानंतर क्रुज टप्पा येतो आणि हॅलो ऑर्बिटमध्ये L1 स्थान प्राप्त होते. जर या ठिकाणी वेग नियंत्रित केला नाही तर तो थेट सूर्याकडे जाईल आणि जळून खाक होईल.
आदित्य L1च्या माध्यमातून सूर्याचे वातावरण आणि चुंबकीय क्षेत्राची माहिती गोळा करेल. त्यात 7 पेलोड बसवण्यात आले आहेत. जे सूर्याची किरणं आणि त्यातून निघणारे रेडिएशन, सोलर वादळ, फ्लेअर्स आणि कोरोनल मास इजेक्शन (CME) यांचा अभ्यास करतील. याशिवाय सूर्याचे इमेजिंग केले जाणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT