जळगाव : राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाचा भराव खचला, प्रशासनाकडून वाहतूक बंद

मुंबई तक

Jalgaon mumbai nagpur highway bypasse flyove mbankment collapse : जळगावातील मुसळधार पावसामुळे मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाचा भराव खचला. घटनास्थळी पाहणी करत मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाईची मागणी केली.

ADVERTISEMENT

Jalgaon mumbai nagpur highway bypasse flyove mbankment collapse
Jalgaon mumbai nagpur highway bypasse flyove mbankment collapse
Google CTA

बातम्या हायलाइट

point

जळगाव : राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाचा भराव खचला

point

प्रशासनाकडून वाहतूक बंद

Jalgaon mumbai nagpur highway bypasse flyove mbankment collapse : जळगावमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाचा भराव खचल्याची माहिती समोर आलीये. पाळधी ते तरसोद दरम्यानच्या बायपासजवळ हा प्रकार घडलाय. पहिल्याच जोरदार पावसात उड्डाणपुलाजवळ तडे जाऊन भराव खचल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून बायपासवरील वाहतूक तात्पुरती बंद केली आहे. या घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून नागरिकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे हा बायपास अवघ्या वर्षभरापूर्वीच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. त्यामुळे इतक्या कमी कालावधीतच भराव खचल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

हेही वाचा : "वडिलांना फक्त 60 हजार पगार, मग अभिजीत शिक्षणासाठी अमेरिकेत कसा गेला?"

अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना

घटनेची माहिती मिळताच मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. त्यांच्या पाहणीदरम्यान जिल्हाधिकारी, इतर शासकीय अधिकारी तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. घटनास्थळी झालेल्या पाहणीत दोन्ही मंत्र्यांनी अधिकाऱ्यांकडून संपूर्ण घटनेची माहिती घेतली. तसेच नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. या वेळी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

हेही वाचा : चंद्रपुरात पुरूषानं घेतला तंत्र मंत्राचा आधार, महिलेला शेजारच्यासोबत शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडलं