Jitendra Awhad : पवारांच्या दोन नेत्यांमध्ये ठिणगी; आव्हाडांचं रोहित पवारांना खरमरीत उत्तर
रोहित पवारांनी जपून बोलण्याचा सल्ला दिल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले. त्यांनी केलेल्या ट्विटवर बोलताना आव्हाडांनी चिमटे काढले.
ADVERTISEMENT

Jitendra Awhad Rohit Pawar : ‘देव या विषयावर अनावश्यक बोलून विरोधकांच्या सापळ्यात न अडकण्याचं भान सर्वांनीच ठेवलं पाहिजे’, असा सल्ला देणाऱ्या आमदार रोहित पवारांना आमदार जितेंद्र आव्हाडांनी खरमरीत उत्तर दिले. राम मांसाहारी होता, या विधानावरून सुरू झालेल्या वादावर आव्हाडांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात रोहित पवार लहान आहेत म्हणत सुनावलं.
राम मांसाहारी होता, या विधानावरून जितेंद्र आव्हाड विरोधकांच्याच टीकेचे धनी झाले नाहीत, तर स्वपक्षातील आमदारानेही त्यांना सुनावलं. जेव्हा पत्रकार परिषदेत त्यांना याबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा त्यांनी रोहित पवार लहान आहेत, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. अबुधाबीतून ट्विट करणं सोप्पं आहे, असे म्हणत समाचार घेतला.
जितेंद्र आव्हाडांनी रोहित पवारांना काय दिलं उत्तर?
“आज नको त्या विषयावर बोलून वाद ओढवून घेण्यापेक्षा राज्यातील वाढती बेरोजगारी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, महिलांची सुरक्षितता, शेतमालाला भाव नसणं, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणं, जाती-जातींमध्ये निर्माण केला जाणारा तणाव या ज्वलंत विषयांवर बोलून सरकारला धारेवर धरण्याची अधिक गरज आहे”, असा सल्ला रोहित पवारांनी जितेंद्र आव्हाडांना दिला होता.
आज नको त्या विषयावर बोलून वाद ओढवून घेण्यापेक्षा राज्यातील वाढती बेरोजगारी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, महिलांची सुरक्षितता, शेतमालाला भाव नसणं, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणं, जाती-जातींमध्ये निर्माण केला जाणारा तणाव या ज्वलंत विषयांवर बोलून सरकारला धारेवर धरण्याची…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 3, 2024