कोल्हापूर : महिलेसोबत रुममध्ये सापडला शिक्षक, नातेवाईकांकडून बेदम मारहाण; नग्नावस्थेत बांधलं अन्..

Kolhapur Crime : कोल्हापूर : महिलेसोबत रुममध्ये सापडला शिक्षक, नातेवाईकांकडून बेदम मारहाण; नग्नावस्थेत बांधलं अन्..

ADVERTISEMENT

Kolhapur Crime
Kolhapur Crime
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

कोल्हापूर : महिलेसोबत रुममध्ये सापडला शिक्षक

point

नातेवाईकांकडून बेदम मारहाण; नग्नावस्थेत बांधलं अन्..

Kolhapur Crime, कुरुंदवाड : टाकवडे (ता. शिरोळ) येथे एका शिक्षकाला महिलेसोबत आढळून आल्याने संतप्त नातेवाईकांनी त्याला चांगलाच चोप देत घरातच बंदिस्त केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी रात्री घडली. परिस्थिती तणावपूर्ण होताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून शिक्षकाची सुटका केली आणि त्याला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेले. या प्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

मिळालेल्या माहितीनुसार, इचलकरंजीतील एका नामांकित शाळेत कार्यरत असलेल्या या शिक्षकाचे संबंधित महिलेसोबत मागील काही काळापासून संबंध असल्याची माहिती नातेवाईकांना मिळाली होती. याबाबत त्यांनी शिक्षकाला वारंवार इशारे दिले होते. तरीही शिक्षकाने ऐकून न घेतल्याने कुटुंबीयांमध्ये नाराजी वाढत होती.

शुक्रवारी सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास हा शिक्षक टाकवडे येथील त्या महिलेच्या घरी आला. तेव्हा नातेवाईकांनी अचानक घरात धाड टाकली आणि शिक्षक महिलेसोबत असल्याचे पाहून संतापले. रागाच्या भरात त्यांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली. इतकेच नव्हे, त्याला कपडे उतरवून दोरीने बांधून घरात कैद करून ठेवले.

हेही वाचा : अंतवस्त्रात 6 किलो सोनं ठेवलं, मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात पोहोचले, गुप्तचर यंत्रणेला कुणकुण लागली अन्...

घटनेची माहिती शेजाऱ्यांना मिळताच काही वेळातच घरासमोर मोठी गर्दी जमा झाली. काही नागरिकांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, मात्र महिलेचे नातेवाईक ठाम राहून शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करू लागले. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता पाहता शिरोळ पोलिसांनी मोठा बंदोबस्त घेत घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी जमावाला हटवण्यासाठी आणि नातेवाईकांना शांत करण्यासाठी जवळपास तीन तास प्रयत्न केले. शेवटी शिक्षकाची सुटका करून त्याला पोलिस ठाण्यात आणण्यात आले. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या घटनेने टाकवडे परिसरात मोठी चर्चा रंगली असून गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी पुढील अनपेक्षित परिस्थिती टाळण्यासाठी घटनास्थळी बंदोबस्त कायम ठेवला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

छत्रपती संभाजीनगर : शेकोटीतून ठिणगी उडून कपड्यावर पडली अन् पेट घेतला, वृद्धाच्या दुर्दैवी मृत्यूने हळहळ