Lok sabha Security : अमोल शिंदेसह तिघं चांगलेच फसले, दाखल झाला UAPA!
संसदेत घुसखोरी करणाऱ्या आरोपीविरुद्ध UAPA म्हणजेच संसद उल्लंघन प्रकरण अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे की, अटक केलेल्या चार आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 452, कलम 120-B, 153, 186, 353 गुन्हेगारी कट आणि UAPA च्या कलम 16 आणि 18 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

Parliament Security Breach : संसदेत घुसखोरी करणाऱ्या आरोपीविरुद्ध UAPA (Unlawful Activities Prevention Act) म्हणजेच संसद उल्लंघन प्रकरण अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे की, अटक केलेल्या चार आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 452, कलम 120-B, 153, 186, 353 गुन्हेगारी कट आणि UAPA च्या कलम 16 आणि 18 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (lok sabha security breach news Police Filed Case under UAPA on 4 Accused)
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी सागर, अमोल, मनोरंजन आणि नीलम यांना अटक करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या सर्व कलमान्वये या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच आता दिल्ली पोलिसांचे स्पेशल सेल या प्रकरणाचा तपास करणार आहे.
वाचा : अमोल शिंदेच्या मदतीला महाराष्ट्राच्या ‘या’ वकिलाची धाव, कायदेशीर लढा देणार!
संसदेतल्या सुरक्षेतील त्रुटींच्या चौकशीचे गृह मंत्रालयाचे आदेश!
त्याचवेळी केंद्रीय गृह मंत्रालयाने 13 डिसेंबरच्या रात्री या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेशही जारी केले. गृह मंत्रालयाने ट्वीटरवर पोस्ट करून ही माहिती दिली. मंत्रालयाने लिहिले, “लोकसभा सचिवालयाच्या विनंतीवरून, गृह मंत्रालयाने संसदेतल्या सुरक्षेतील त्रुटींच्या घटनेच्या चौकशीचे आदेश जारी केले आहेत.
सीआरपीएफचे महासंचालक अनिश दयाल सिंग यांच्या नेतृत्वाखाली एक चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात इतर सुरक्षा एजन्सी आणि तज्ञ देखील सहभागी आहेत.”