बड्या नेत्यानं महिलेसोबत भररस्त्यात केलं अश्लील कृत्य! Video व्हायरल होताच भाजप नेत्यानं दिलं स्पष्टीकरण

मुंबई तक

MP Politician Viral Video : मध्य प्रदेशच्या मंदसौर जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील स्थानिक नेता मनोहरलाल धाकडने त्याच्या मैत्रिणीसोबत अश्लील कृत्य केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

ADVERTISEMENT

MP Politician Viral Video
MP Politician Viral Video
social share
google news

बातम्या हायलाइट

point

त्या नेत्याचं भाजप कनेक्शन आलं समोर?

point

महिलेसोबत अश्लील कृत्य केल्याचा व्हिडीओ व्हायरल

point

नेमकी कुठे घडली ही धक्कादायक घटना?

MP Politician Viral Video : मध्य प्रदेशच्या मंदसौर जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील स्थानिक नेता मनोहरलाल धाकडने त्याच्या मैत्रिणीसोबत अश्लील कृत्य केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या नेत्याचा व्हिडीओ पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. ही घटना दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवर घडली. हा धक्कादायक प्रकार हायवेवरील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरु आहे. 

नेत्याच्या अश्लील व्हिडीओमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, भानपूरा पोलिसांनी मनोहरलाल धाकड आणि त्याच्या मैत्रिणीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 296, 285 आणि 3 (5) च्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे. या आरोपी नेत्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अनेक टीम गठित करण्यात आल्या आहेत. परिवहन विभागाच्या तपासात उघड झालं आहे की, सीसीटीव्हीत दाखवलेली सफेद कार मनोहरलाल धाकडच्या नावावर आहे. त्याची पत्नी सोहन बाई बिना जिल्हा पंचायत सदस्य आहे.

हे ही वाचा >> Monsoon Rain Update: मान्सून आला रे... 16 वर्षानंतर नवा विक्रम, महाराष्ट्रात 'या' तारखेला पोहचणार!

आरोपी मनोहर लाल धाकड यांचे राजकीय संबंध चव्हाट्यावर आल्यावर भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश दीक्षित यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं. त्यांनी म्हटलं, मनोहरलाल धाकड भाजपचे प्राथमिक सदस्य नाहीत. त्यांची पत्नी जिल्हा पंचायत सदस्य आहे. पण पक्षाशी त्यांचा थेट संबंध नाही. या व्हायरल व्हिडीओनंतर सामाजिक स्तरावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. धाकड यांना महासभा युवा संघाने तातडीनं पदावरून हटवलं आहे. ते यामध्ये राष्ट्रीय पदावर कार्यरत होते. राष्ट्रीय अध्यक्ष अर्जून धाकड यांनी म्हटलं की, संघटनेची प्रतिष्ठा राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 

हे ही वाचा >> Viral Video : कारमध्ये प्रियकरासोबत नको ते करताना सापडली पत्नी, पतीने 'सिंदूर' पुसलं अन्...

रतलाम येथील डीआयजी मनोज सिंग यांनी या घटनेचा निषेध करत म्हटलंय, सार्वजनिक ठिकाणी अशाप्रकारचे कृत्य करणे कायदेशीर गुन्हा आहे. सार्वजनिक रस्ते नागरिकांच्या प्रवासाच्या सोयीसाठी बनवलेले असतात. पोलीस या घटनेचा कसून तपास करत आहेत. आरोपीला अटक करण्यासाठी जवळपासच्या विभागात अलर्ट जारी केला आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp