Rain Update in Maharashtra : मान्सून मुंबईत! पुणे, नागपूरसह ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंट अलर्ट!

मुंबई तक

ADVERTISEMENT

The Meteorological Department has issued a yellow alert regarding rain in many areas of Mumbai for the next two days.
The Meteorological Department has issued a yellow alert regarding rain in many areas of Mumbai for the next two days.
social share
google news

Mumbai weather today warning : गेल्या दोन आठवड्यांपासूनची प्रतीक्षा अखेर संपली. जून महिन्याच्या अखेरीस पावसाने जोरदार हजेरी लावली. मुंबईसह राज्यातील अनेक भागांत मुसळधार सरी बरसल्या. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीप्रमाणे मान्सून, रविवारी (25 जून) मुंबईत दाखल झाला आहे. तसेच महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाचा जोर वाढणार असून, भारतीय हवामान विभागाने पुणे, नागपूरसह काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. (mumbai rain update : How many mm rainfall in Mumbai today?)

बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनचे आगमन लांबणीवर पडले होते. परिस्थिती अनुकूल झाल्यानंतर मान्सून पुढे सरकारला असून, राज्यातील विविध भागात शनिवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली.

पहिल्याच पावसात मुंबईत तुंबली, नोकरदारांची हेळसांड

जूनचे दोन आठवडे कोरडे गेल्यानंतर मुंबईत शनिवारी मुंबई, मुबंई उपनगर, ठाणे, नवी मुंबईत धो-धो पाऊस झाला. दिवसभर पावसाचा जोर कायम राहिल्याने मुंबई महापालिकेकडून करण्यात आलेले दावे फोल ठरले. मुंबईतील अनेक भागांत पाणी भरले. दरवर्षीप्रमाणे यंदाही अंधेरी सबवे मध्ये पाणी भरल्याने वाहतूक वळवावी लागली. तसेच इतर भागांतही पाणी साचले होते. त्यामुळे वाहतूक मंदावली आणि नोकरदारांची हेळसांड झाल्याचे बघायला मिळाली. मुंबईत शनिवारी 115.8 मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Patna : 17 पक्ष, अजेंडा आणि… विरोधकांसमोर आहेत ‘ही’ मोठी आव्हानं

हवामान विभागाकडून अनेक जिल्ह्यांना ऑरेंट अलर्ट

मान्सून हळूहळू पुढे सरकत असून, पुढील काही दिवसांत राज्यातील वेगवेगळ्या भागांत पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाने 28 जूनपर्यंत कोणत्या जिल्ह्यात पावसाची स्थिती काय असेल, याबद्दल माहिती दिली आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Pune, MPSC: ‘दर्शना पवारला राहुल दीदी, दीदी… बोलयचा’, धक्कादायक माहिती समोर

रायगड, रत्नागिरीला झोडपणार

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे आज (25 जून) रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर पुणे, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूरसह विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Devendra Fadnavis: ‘घरात घुसलोच तर त्यांना तोंड दाखवायलाही..’, फडणवीस ठाकरेंवर संतापले

26 जूनला विदर्भात जोर वाढणार

सोमवारी (26 जून) विदर्भातील काही जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला गेला आहे. कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांनाही अतिमुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. राज्याती काही जिल्ह्यात मुसळधार, तर काही भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे.

27 जून : पुणे, नागपूरला इशारा

मंगळवारी (27 जून) पुणे, रायगडसह विदर्भातील काही जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला गेला आहे. हवामान विभागाने रायगड, पुणे, अमरावती, नागपूर, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. पालघर, नाशिक, नंदूरबार, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह विदर्भातील बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT