Maharashtra weather : चार जिल्ह्यांना 'रेड अलर्ट'; मुंबई, पुण्याला IMD चा इशारा!
Mumbai weather update : मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही जिल्ह्यांत अतिवृष्टीचाही अंदाज असून हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
महाराष्ट्र हवामान अंदाज १४ जुलै २०२४
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात कसा असेल पाऊस?
हवामान विभागाने कोणत्या जिल्ह्यांना दिला आहे रेड अलर्ट?
Maharashta, Mumbai Weather Forecast : गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसाचा जोर या आठवड्यातही कायम राहणार आहे. महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील तीन-चार दिवस राज्यासाठी सतर्कतेचे असणार आहे. चार जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, मुंबई, पुणे, ठाणे जिल्ह्यासह इतर काही भागासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. (IMD has given red alert to four districts namely Ratnagiri, Sindhudurg, Satara and Kolhapur. The Meteorological Department has warned of heavy rain in other parts of Maharashtra including Mumbai, Pune and Thane districts)
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने राज्यातील काही भागांत अतिमुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मुंबईतही मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. (IMD issues orange alert for heavy rain in Mumbai)
महाराष्ट्रात आज कसे असेल हवामान? (Maharashtra Weather 14 July)
भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, नंदूरबार, धुळे आणि नाशिक हे तीन जिल्हे वगळता राज्याच्या इतर भागात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी विजाच्या कडकडाटासह पाऊस होईल.
हे वाचलं का?
हेही वाचा >> "ऐनवेळी असे का केले?", ठाकरेंना पाटलांचा संतप्त सवाल
सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्गला रेड अलर्ट
कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांत अतिमुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या चार जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील प्रशासनही सतर्क झाले आहे.
ADVERTISEMENT
पुणे, ठाणे, रायगडला ऑरेंज अलर्ट
रविवारी (14 जुलै) पुणे जिल्ह्यासह लगतच्या रायगड आणि ठाणे जिल्ह्यातही अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. या तीन जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> विधानसभेतही महायुतीला बसणार झटका, 'मविआ'चं काय? खळबळ उडवणारा सर्व्हे
मुंबईत पावसाचा जोर वाढणार (Mumbai Weather Forecast for 15 July)
सोमवारी (15 जुलै) मुंबईत पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, परभणी या जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT