Maharashtra Weather : पालघर, ठाणे, मुंबई, रायगडमध्ये हलका पाऊस बरसणार! 'या' जिल्ह्यांना बसणार वादळाचा तडाखा!
Maharashtra Weather Today : मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांत हवामानात लक्षणीय बदल होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

राज्यात कोणत्या जिल्ह्यात असेल कोरडं हवामान?

कोणत्या जिल्ह्यात होणार पावसाचं आगमन?

जाणून घ्या महराष्ट्रातील आजच्या हवामानाबाबत सविस्तर माहिती
Maharashtra Weather Today : मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांत हवामानात लक्षणीय बदल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. काल 3 मे रोजी प्रादेशिक हवामान विभागाने पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव , पुणे , कोल्हापूर घाट परिसर, कोल्हापूर, सातारा, सातारा घाट परिसर, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी,बीड, हिंगोली, धाराशिवमध्ये कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तवला होता. तर धुळे, नंदूरबार,अहिल्यानगर, पुणे घाट परिसर, नांदेड, लातूरमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती. अशातच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये आजचं हवामान कसं असणार आहे, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
कसं असेल महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये आजचं हवामान?
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज 4 मे 2025 रोजी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, पुणे घाट परिसर, सातारा, सातारा घाट परिसरात हलक्या आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये कोरडं हवामान असणार आहे.
हे ही वाचा >> Maharashtra Board SSC Result 2025 : 10 वीच्या निकालाची तारीख लवकरच, रोल नंबर 'असा' करा डाऊनलोड
तसच धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजी नगरमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे, हलका ते मध्यम पावसासह सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेगाने) येण्याची शक्यता आहे. तर अमरातवती भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळमध्ये 40-50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात. बुलढाणा, अकोला आणि वाशिमसाठी हवामान विभागाकडून कोणत्याही प्रकारचा इशारा देण्यात आला नाही.
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट परिसर, कोल्हापूर घाट परिसर, कोल्हापूर, सातारा, सातारा घाट परिसर, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, हिंगोलीत कोरड्या हवामानचा अंदाज हवामान विभागाकडून या आठवड्यात वर्तवण्यात आला होता.